यशवंतरावाना पहिले नाही, त्यांचे एकही पुस्तक वाचले नाही, पण त्यांनी पेरलेल्या कामाने इतके काही दिले की त्यांचे काही अंशी चेले बनण्याचे जे भाग्य लाभले त्यामुळे कायम स्वरुपी कार्यकर्ता म्हणून जगण्यातली मजा काही वेगळीच.
लग्नानंतर १५ वर्ष संसार, मुलगा, आर्थिक बाजू या गोष्टी स्थिरस्थावर झाल्यावर केशवसृष्टीचे काम करू लागले. केशवसृष्टी सामाजिक पुरस्कार निमित्त अनेक संस्था भेटी करण्याची संधी मिळत राहिली. संघ परिघाबाहेरही अनंत संस्था वेगवेगळ्या समस्यांवर अपार कष्ट घेऊन उत्तम काम करीत आहेत, हे अनुभवायला मिळाले. परिषदेमध्ये असताना शैक्षणिक प्रश्न आणि कार्यकर्ता संपर्कातून त्यांच्या घरातली परिस्थिती बघून जे काही कौटुंबिक समस्या पाहण्यात आल्या असतील त्या व्यतिरिक्त समाजात असणाऱ्या अनंत दुर्लक्षित समस्या कधी दिसल्याच नाही, पण समस्यांकडे संवेदनशीलतेने बघण्याची दृष्टी मात्र विद्यार्थी परिषदेच्या कामातूनच मिळाली. कुठलीही समस्या एकदम मनालाच जाऊन भिडायची आणि म्हणूनच संस्था भेटीतल्या कुठल्याही संस्थे बरोबर पटकन सलग्न होत होते.
आतापर्यंत ४० संस्थांना तरी आम्ही निवड टीमने भेटी दिल्या आहेत. आता या प्रत्येक भेटीचं नियोजन करणे, भेटीनंतर त्या संस्थेविषयी काही लिहायचे असेल, पुरस्कार कार्यक्रमाची आखणी , बैठका, खाते वाटप, पाठपुरावा या सर्वांमध्ये पुढाकाराने काम अंगावर घेणे आपसूक घडते. पुढे त्या संस्थेकरिता काही पूरक काम करण्याचा योग आला की पुढे होऊन ते करणेही सहज घडते.
हेही वाचा..
१ ऑगस्टच्या मुदतीपूर्वी टॅरिफ चर्चेसाठी प्रयत्न करावेत
आफ्रिकेत कॉलरा, एमपॉक्सचा प्रकोप
मुख्तार अब्बास नकवी यांचा महागठबंधनवर हल्लाबोल
टेकऑफवेळी पायलट स्विचेसमध्ये छेडछाड करत नाही
टीममध्ये सोबत काम करणाऱ्यांबरोबर संवाद आणि उत्तम मैत्री करणं असेल, जिथे राहतो तेथील भागात ज्येष्ठांना मदत करणं, मुलांसाठी उपक्रम राबविणे, महिलांचे कार्यक्रम घेणे असेल, असा कामातला उत्साह ना कधी थांबला ना कमी झाला. उलट कामाची भूक वाढतच गेली. आहे तेवढी एनर्जी अशाच कामात घालावी असा एक जणू मानसिकता बनून गेली.
मला मी करत असलेल्या कामाचा दिंडोरा पिटवायचा नाही. पण वयाच्या १६ व्या वर्षी संपर्कात येऊन पुढे ९ वर्षे परिषदेचं काम केलं तर ते कसं रक्तात भिनलं, ते कसं प्रत्येक टप्प्यावर प्रकट होत गेलं आणि खूप काही समाधान देऊन गेलं,जगण्याची दिशा मिळाली हे सांगण्याचा …. येवढाच काय तो हेतू
-रश्मी भातखळकर.
