एसटीला १०,३२२ कोटींचा संचित तोटा, पण नफ्यात आणणार!

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणतात नफ्यात आणणार

एसटीला १०,३२२ कोटींचा संचित तोटा, पण नफ्यात आणणार!

महाराष्ट्राची जीवनवाहिनी मानली जाणारी एसटी महामंडळ सध्या गंभीर आर्थिक अडचणीत असून तिचा एकूण संचित तोटा तब्बल १०,३२२ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. हा खुलासा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज एसटी महामंडळाची आर्थिक श्वेतपत्रिका सादर करताना केला.

मंत्री सरनाईक म्हणाले, “२०१८-१९ मध्ये एसटीचा संचित तोटा सुमारे ४,६०० कोटी होता. मात्र, कोविडच्या टाळेबंदीत बस सेवा बंद, व नंतर कर्मचाऱ्यांच्या संपामुळे उत्पन्नावर मोठा परिणाम झाला आणि सध्याचा तोटा दुप्पटीने वाढून १०,३२२ कोटींवर गेला आहे. यामध्ये ३,००० कोटींच्या कर्मचाऱ्यांच्या देणग्या सुद्धा समाविष्ट आहेत.”

ते पुढे म्हणाले, “राज्य शासनाकडून आर्थिक मदतीची नितांत गरज आहे. शासन अनुदानाशिवाय महामंडळाची गाडी रुळावर आणणं अशक्य आहे.”


🟩 बातमी २: ४ वर्षांत एसटीला फायद्यात आणण्याचा निर्धार — मंत्री सरनाईक यांची घोषणा

मुंबई | २३ जून
जरी सध्या एसटी महामंडळ १० हजार कोटींहून अधिक संचित तोट्यात असलं, तरी येत्या चार वर्षांत एसटीला फायद्यात आणण्याचा निर्धार परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला आहे. मुंबईत महामंडळाची आर्थिक श्वेतपत्रिका सादर करताना त्यांनी ही ग्वाही दिली.

“एसटी ही राज्यातील तब्बल ९०% लोकसंख्येला सेवा देणारी ‘लोकवाहिनी’ आहे. दररोज ५५ लाख प्रवाशांचे दळणवळण करणाऱ्या या महामंडळाची आर्थिक परिस्थिती सशक्त होणं ही काळाची गरज आहे. एसटी नफ्यात येण्यासाठी शासनाच्या मदतीबरोबरच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनीही कामाची उत्पादकता वाढवणं आवश्यक आहे,” असे सरनाईक म्हणाले.

आदिवासी भागांत लवकरच ५० मिनी बसेस सुरू करण्याचाही निर्णय त्यांनी यावेळी जाहीर केला. “तोटा सहन करूनही, आम्ही दुर्गम भागांत सेवा देण्यासाठी कटिबद्ध आहोत,” असा ठाम शब्दही त्यांनी दिला.

Exit mobile version