महाराष्ट्रातील २८८ नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांमध्ये सत्ताधारी महायुती (भाजप–शिवसेना–राष्ट्रवादी काँग्रेस) यांना दणदणीत विजय मिळाला आहे. महायुतीने २०७ नगराध्यक्ष पदे जिंकली, तर विरोधी महाविकास आघाडीला (MVA) केवळ ४४ पदांवर समाधान मानावे लागले.
राज्य निवडणूक आयोगाच्या अंतिम निकालानुसार, भाजप सर्वाधिक ११७ नगराध्यक्ष पदांसह आघाडीवर राहिला. त्यापाठोपाठ एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेने ५३, तर राष्ट्रवादी काँग्रेसने ३७ पदे जिंकली. पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादीने १७ पैकी १० नगराध्यक्ष पदे मिळवली.
विरोधी पक्षांमध्ये काँग्रेसला २८, शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीला ७, तर उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेला केवळ ९ पदे मिळाली. नोंदणीकृत पण मान्यता नसलेल्या पक्षांना ४, तर इतर नोंदणीकृत पक्षांना २८ पदे मिळाली. अपक्ष उमेदवारांनी ५ पदे जिंकली.
हे ही वाचा:
आंतरिक शांती, सामाजिक सलोख्यासाठी ध्यान आवश्यक
बांगलादेशातील तणाव : अमेरिकन दूतावासाकडून अलर्ट
राष्ट्रपतींकडून ‘जी राम जी विधेयक’ला मंजुरी
आता भाजपा शहरात आणि ग्रामीण भागातही नंबर वन
या निकालांमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही महायुतीचे वर्चस्व स्पष्ट झाले, तर महाविकास आघाडीला पुन्हा एकदा जनतेचा विश्वास मिळवण्यात अपयश आले आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महायुतीच्या विजयाबद्दल अभिनंदन करताना महाराष्ट्रातील जनतेचे आभार मानले. विकासाच्या राजकारणावर जनतेने विश्वास दाखवला असून, सरकार नव्या जोमाने जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी काम करेल, असे त्यांनी सांगितले.
