राज्यातील मागास भागांच्या औद्योगिक आणि तंत्रज्ञान विकासाला चालना देण्यासाठी सोलापूरमध्ये भव्य आयटी पार्क उभारण्यात येणार असल्याची महत्त्वाची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, सोलापूरमध्ये आयटी पार्क उभारल्यामुळे या भागातील तरुणांना मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. सध्या आयटी क्षेत्रात करिअर करणाऱ्या अनेक तरुणांना पुणे, मुंबई, बेंगळुरू यांसारख्या शहरांमध्ये स्थलांतर करावे लागते. नव्या आयटी पार्कमुळे स्थानिक पातळीवरच दर्जेदार नोकऱ्या उपलब्ध होतील आणि स्थलांतर रोखण्यास मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या आयटी पार्कसाठी आवश्यक जमीन उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया सुरू असून एमआयडीसीमार्फत हा प्रकल्प राबवला जाणार आहे. आधुनिक पायाभूत सुविधा, उच्च दर्जाचे इंटरनेट नेटवर्क, स्टार्टअपसाठी आवश्यक सुविधा तसेच मोठ्या आयटी कंपन्यांना आकर्षित करणारी रचना या प्रकल्पात असेल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
हे ही वाचा :
उद्धव ठाकरेंचं मुंबईतलं काम सांगा, ३ हजार घ्या!
राजकीय महत्त्वाकांक्षेसाठी सभागृहाचा गैरवापर सहन केला जाणार नाही
पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी सोमनाथमध्ये तयारी पूर्ण
पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी सोमनाथमध्ये तयारी पूर्ण
फडणवीस यांनी सांगितले की, सोलापूर केवळ वस्त्रोद्योगापुरते मर्यादित न राहता आता तंत्रज्ञान, नवउद्योग आणि डिजिटल सेवांचे केंद्र बनेल. आयटी पार्कमुळे शहराच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, लघुउद्योगांना नवे बाजार मिळतील आणि अप्रत्यक्ष रोजगारही मोठ्या प्रमाणात निर्माण होतील.
या घोषणेमुळे सोलापूर जिल्ह्यातील तरुणांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, स्थानिक उद्योजक व शैक्षणिक क्षेत्रातून या निर्णयाचे स्वागत करण्यात येत आहे. राज्य सरकारचा हा निर्णय सोलापूरच्या दीर्घकालीन विकासासाठी मैलाचा दगड ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
