मनोज जरांगेनी उपोषण सोडलं!

८ पैकी सहा मागण्या मान्य 

मनोज जरांगेनी उपोषण सोडलं!

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मागील पाच दिवसांपासून आझाद मैदानावर सुरु असलेलं उपोषण अखेर मनोज जरांगे पाटील यांनी सोडलं. मराठा समाजाच्या उपसमितीच्या सदस्यांनी जरांगे यांनी भेट घेत सरकारकडून त्यांच्या ८ पैकी सहा मागण्या मान्य केल्याचे सांगितले. समितीने त्याबाबत जीआर मनोज जरांगे यांच्या हाती सोपवल्यानंतर त्यांनी पाणी पिवून उपोषण सोडलं. दरम्यान, मागण्या मान्य झाल्यानंतर समाजाने एकच जल्लोष केला. मराठा आंदोलकांकडून गुलाल उधळून जल्लोष करण्यात आला. ‘आरक्षणाची लढाई जिंकलो’, अशी जरांगे यांनी यावेळी घोषणा केली.

मराठा आरक्षणासाठी हैदराबाद आणि सातारा गॅझेटची अंमलबजावणी करावी अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली होती. त्यावर उपसमितीने मोठा निर्णय घेतला. हैदरबाद गॅझेट मान्य करत असून त्याचा तातडीने जीआर काढण्याची तयारी उपसमितीने दर्शवली. त्यामुळे नात्यातील, कुळातील आणि गावातील लोकांची चौकशी करून कुणबी सर्टिफिकेट दिले जाणार आहे. सातारा गॅझेटच्या अंमलबजावणीसाठी पंधरा दिवसांचा अवधी उपसमितीने मागितला आहे. औंध आणि सातारा गॅझेटमधील तरतुदी किचकट असल्याने हा वेळ मागितला आहे.

मनोज जरांगेंच्या कोणत्या मागण्या मान्य?

हैदराबाद गॅझेट अंमलबजावणीसाठी शासन निर्णय – मान्य
आंदोलनातील मृतांच्या वारसांना आर्थिक मदत – मान्य
आंदोलनातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी – मान्य
मराठा आंदोलकांवरील केसेस मागे – मान्य
प्रलंबित जात पडताळणीला मान्यता – मान्य
आंदोलकांवरील गुन्हे घेण्यास मान्यता – मान्य

मनोज जरांगेंच्या कोणत्या मागण्या प्रलंबित?

सातारा गॅझेट अंमलबजावणीसाठी – १ महिन्याची मुदत
मराठा-कुणबी एकच शासन निर्णय – २ महिन्यांची मुदत

हे ही वाचा  : 

‘वोट चोरी’ आरोपांमध्ये काँग्रेसची फजिती; प्रवक्ते पवन खेऱा यांच्या नावावर दोन मतदार ओळखपत्रे

दिल्ली दंगलप्रकरणी उमर खालिद, शरजील इमामसह इतर ७ जणांना जामीन नाही!

अफगाणिस्तानातील भूकंपात मृतांचा आकडा १,४११ वर; हजारो जखमी!

अफगाणिस्तानातील भूकंपात मृतांचा आकडा १,४११ वर; हजारो जखमी!

मराठा समाजाच्या उपसमितीत कोण कोण?

१. राधाकृष्ण विखेपाटील, जलसंपदा मंत्री – अध्यक्ष
२. चंद्रकांत पाटील, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री – सदस्य
३. गिरीश महाजन, जलसंपदा मंत्री – सदस्य
४. दादा भुसे, शालेय शिक्षण मंत्री – सदस्य
५. उदय सामंत, उद्योग मंत्री – सदस्य
६. शंभूराज देसाई, पर्यटन मंत्री – सदस्य
७. आशिष शेलार, सांस्कृतिक कार्यमंत्री – सदस्य
८. शिवेंद्रसिंहराजे भोसले, सार्वजनिक बांधकाम मंत्री – सदस्य
९. माणिकराव कोकाटे, क्रीडामंत्री – सदस्य
१०. मकरंद जाधव, मदत व पुनर्वसन मंत्री – सदस्य

११. बाबासाहेब पाटील, सहकार मंत्री – सदस्य
१२. सचिव –  सामान्य प्रशासन विभाग – उपसमितीचे सचिव

 

Exit mobile version