जिथे दाटलाय अंधार, पसरू दे तिथे प्रकाशाची किरणे, हेच खरे स्वातंत्र्य… 

दिव्यांग मुलांच्या शाळेतील मुलांसोबत आमदार भातखळकरांचे ध्वजारोहण 

जिथे दाटलाय अंधार, पसरू दे तिथे प्रकाशाची किरणे, हेच खरे स्वातंत्र्य… 

७९ व्या स्वातंत्र्यदिनी भारतात उत्साहाचे वातावरण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्यावर ध्वजारोहण केले आणि देशाला संबोधित केले. यावेळी त्यांनी तब्बल १०३ मिनिटे भाषण केले, जे आतापर्यंतच्या त्यांच्या कार्यकाळातील सर्वाधिक होते. प्रत्येक शाळा महाविद्यालय, संस्था, आणि सरकारी कार्यालयांमध्ये तिरंगा फडकवला गेला. भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी देखील आपल्या विभागात ध्वजारोहण केले. मात्र, यंदाचे ध्वजारोहण त्यांच्यासाठी खास होते. आपल्या परिसरातील दिव्यांग शाळेला भेट देत, शाळेतील मुलांसोबत त्यांनी सोबत ध्वजारोहण केले. शाळेतील मुलांसोबत त्यांनी फोटो शेअर करत, हेच खरे स्वातंत्र्य…, असे म्हटले.

एक्सवर पोस्ट करत भातखळकर म्हणाले, जिथे दाटलाय अंधार , पसरू दे तिथे प्रकाशाची किरणे, मिळू दे काळकभिन्न तमापासून मुक्ती, हेच खरे स्वातंत्र्य… स्वातंत्र्य दिनानिमित्त आज माझ्या कांदिवली पूर्व मतदार संघातील ‘नव दिव्यांग फाउंडेशन’ या दिव्यांग मुलांच्या शाळेत या मुलांच्या सोबत ध्वजारोहण केले. जेव्हा समाजातील सर्वांना समानसंधी मिळेल, तेव्हाच देशाच्या स्वातंत्र्याला बळ मिळेल. स्वातंत्र्य खऱ्या अर्थाने चिरायू होईल. जय भारती, वंदे भारती.

स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला त्यांनी आपल्या विभागात भव्य तिरंगा यात्राही काढली. एक्सवर भातखळकरांनी पोस्ट केले की, ‘आन तिरंगा है, मेरी शान तिरंगा है…’ स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला माझ्या कांदिवली पूर्व मतदार संघातील, मालाड भागात आम्ही भव्य तिरंगा यात्रा काढली. नागरिकांनी मोठ्या उत्साहाने या सहभाग घेतला. भारत माता की जय… या घोषणेने आसमंत दणाणून सोडला.

हे ही वाचा : 

इंदापूरचा कुख्यात गुंड राजू भाले आणि त्याच्या टोळीवर मकोका अंतर्गत कारवाई!

जम्मू-काश्मीरमध्ये ढगफुटीमुळे मृतांचा आकडा ६० वर, शेकडो अजूनही बेपत्ता!

७९ वा स्वातंत्र्यदिन: पाहुण्यांसाठी “नवभारत” ज्यूट बॅग्स, भेटवस्तू व पावसाळी साहित्य!

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या समर्पणाला केले वंदन

Exit mobile version