नैनी सैनी विमानतळाच्या अधिग्रहणासाठी सामंजस्य करार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उपस्थिती

नैनी सैनी विमानतळाच्या अधिग्रहणासाठी सामंजस्य करार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत रविवारी भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI) आणि उत्तराखंड सरकार यांच्यात पिथौरागढ येथील नैनी सैनी विमानतळाच्या अधिग्रहणासाठी सामंजस्य करार (MoU) करण्यात आला. हा ऐतिहासिक करार उत्तराखंडच्या पर्वतीय भागात सुगम, सुरक्षित आणि शाश्वत हवाई संपर्काच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. नैनी सैनी विमानतळाचे एकूण क्षेत्रफळ सुमारे ७० एकर आहे. येथील टर्मिनल इमारत व्यस्त वेळेत ४० प्रवाशांना सेवा देण्यास सक्षम आहे. तसेच विमानतळाच्या एप्रनवर एकाच वेळी दोन विमाने (कोड-२B) उभी करण्याची सुविधा उपलब्ध आहे.

या अधिग्रहणामुळे विमानतळाच्या विद्यमान पायाभूत सुविधांचे उन्नयन, कार्यप्रणालीचे सुयोग्य व्यवस्थापन आणि उत्तराखंडच्या प्रादेशिक संपर्कात उल्लेखनीय सुधारणा होईल. नैनी सैनी विमानतळाचा विकास राज्याच्या स्थानिक कला, सांस्कृतिक वारसा आणि पर्यटन क्षेत्राला नवी चालना देईल. यामुळे व्यवसाय, धार्मिक पर्यटन, शिक्षण, आरोग्य सेवा आणि आतिथ्य क्षेत्रात नवे संधीचे दरवाजे उघडतील. त्याचबरोबर स्थानिक युवकांसाठी रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील.

हेही वाचा..

कल्याण डोंबिवलीत उबाठाला खिंडार, जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे भाजपात

भारताला मातृभूमी मानणारे सर्व ‘हिंदू’

केंद्राने टाकाऊ वस्तूतून कमावले ८०० कोटी

टोंगारिरो नॅशनल पार्कमध्ये भीषण आग

या उपक्रमामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सुगम्य आणि शाश्वत विमान वाहतूक पायाभूत सुविधा निर्माण करण्याचा दृष्टिकोन अधिक बळकट होईल आणि या धोरणात्मक हिमालयीन प्रदेशात आपत्ती-प्रतिक्रिया क्षमता मजबूत केली जाईल. हा करार उत्तराखंडच्या विकास प्रवासातील एक महत्त्वाचा मैलाचा दगड ठरेल. पंतप्रधान मोदी रविवारी देहरादून येथे पोहोचले, जिथे त्यांनी ‘उत्तराखंड रजत जयंती उत्सव’ मध्ये सहभाग घेतला. या प्रसंगी त्यांनी एक विशेष टपाल तिकिट जारी केले, तसेच उत्तराखंडची परंपरा, संस्कृती आणि प्रगती दर्शवणारे कॉफी टेबल पुस्तकाचे प्रकाशन केले. यावेळी पंतप्रधान मोदींनी ८,००० कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या अनेक विकास प्रकल्पांची भेट उत्तराखंडला दिली. यामध्ये ७३२९.०६ कोटी रुपये खर्चाच्या १९ योजनांचा शिलान्यास, तसेच ९३१.६५ कोटी रुपये खर्चाच्या १२ योजनांचे लोकार्पण करण्यात आले.

Exit mobile version