बहुप्रतीक्षित नवी मुंबई विमानतळाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झाले. या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह केंद्रीय मंत्री उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या भाषणात चौथ्या मुंबईसंदर्भात मोठी घोषणा केली. तसेच नवी मुंबई येथील विमानतळ राज्याच्या अर्थकारणाला हातभार लावेल यावर विश्वास व्यक्त केला.
देवेंद्र फडणवीस यांनी दि. बा. पाटील यांच्या स्मृतीला उजाळा दिला. त्यांनी म्हटले की, या विमानतळाची संकल्पना १९९० च्या दशकातील होती. अनेक वर्षे येथे केवळ एक फलक होता. विमानतळ उभारण्यात आलं नव्हतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्रात आणि महाराष्ट्रात सरकार आलं आणि या विमानतळाच्या कामाला वेग आाला. या विमानतळासंदर्भात आठ एनओसी प्रलंबित होत्या. त्यानंतर नरेंद्र मोदी यांनी याविषयी बैठक घेतली आणि काही तासांत सात एनओसी मिळाल्या. त्यावर त्यांनी आठव्या एनओसीसंदर्भात प्रश्न उपस्थित केले. प्रशासनाने त्यावर काम केलं आणि १५ दिवसांत आठवी एनओसी मिळवली आणि आज सुंदर असं विमानतळ उभं राहिलं आहे.
मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले की, “या विमानतळासाठी डोंगर सपाट केला, नदीचं पात्र वळवलं, अशा अनेक गोष्टी केल्या. हे एक विमानतळ महाराष्ट्राचा जीडीपी एका टक्क्याने वाढवू शकतो.”
हे ही वाचा..
योगींचे गुन्हेगारीविरुद्ध असहिष्णुता धोरण; ४८ तासांत २० एन्काउंटर
काटेकोर नियोजन, शिस्तबद्ध प्रशिक्षणाचे ज्वलंत उदाहरण म्हणजे ‘ऑपरेशन सिंदूर’
पाक संरक्षण मंत्री बरळले, औरंगजेबाचा काळ सोडल्यास भारत कधीही एकसंध राष्ट्र नव्हता
आता कारागृहातही धर्मांतरण; बीडमधील कैद्यांचा आरोप
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ तिसरी मुंबई आणि वाढवण बंदराजवळ चौथी मुंबई उभारणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी जाहीर केलं. वाढवण बंदराजवळ ऑफ शोअर विमानतळ तयार करणार असून नवी मुंबई विमानतळाजवळ तिसरी मुंबई आणि वाढवण बंदराजवळ चौथी मुंबई निर्माण होईल, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. तिसरी मुंबई म्हटल्या जाणाऱ्या पनवेल, उरण तालुक्यातील २३ गावांमध्ये सिडको १२ हजार कोटी रूपये खर्च करत रस्ते उभारणार असल्याचे त्यांनी सांगितले. वाढवण बंदर पालघर जिल्ह्यातील वाढवण येथे उभारलं जाणार आहे. वाढवण बंदरासाठी एकूण ७६२२० कोटी रुपयांचा खर्च येणार असून या बंदराजवळ आणखी एक विमानतळ उभारलं जाणार आहे. तसेच चौथी मुंबई तिथे उभी केली जाईल, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
