एअर इंडियाच्या बोईंग 787 च्या तपासणीत कोणतीही सुरक्षा समस्या नाही

डीजीसीएने केले स्पष्ट

एअर इंडियाच्या बोईंग 787 च्या तपासणीत कोणतीही सुरक्षा समस्या नाही

नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) मंगळवारी दिलेल्या निवेदनानुसार, एअर इंडियाच्या बोईंग 787 फ्लीटवर करण्यात आलेल्या अलीकडील तपासणीत कोणतीही मोठी सुरक्षा त्रुटी आढळलेली नाही. विमाने व त्यासंबंधित देखभाल प्रणाली विद्यमान सुरक्षा मानकांनुसार सुसंगत आढळल्या

DGCA ने सांगितले की, १२ जून रोजी अहमदाबाद येथे झालेल्या भीषण विमान अपघातानंतर बोईंग 787 मॉडेलच्या विमानांसाठी नियोजित ६६ उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. ही अपघातग्रस्त फ्लाइट AI171 होती, जी अहमदाबादहून लंडनकडे निघाली होती.

१२ जून रोजी बोईंग 787-8 ड्रीमलाइनर प्रकारचे एक विमान अहमदाबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर काही क्षणांतच एका वसतिगृहावर कोसळले. या अपघातात विमानातील २४२ पैकी २४१ प्रवासी मृत्युमुखी पडले, तसेच जमिनीवरही डझनभर लोक मृत्यूमुखी पडले.

DGCA च्या तपासणीत असेही स्पष्ट करण्यात आले की, एअर इंडियामध्ये अलीकडच्या काळात देखभाल-संबंधी काही समस्या होत्या, आणि त्यासाठी विभागीय समन्वय सुधारण्याचे निर्देश एअर इंडियाला देण्यात आले आहेत.

हे ही वाचा:

देशातील पहिला रेडिओ महोत्सव मुंबईत, मंत्री आशिष शेलार यांची घोषणा

काँग्रेसने ७५ वर्षांत फक्त बडबडच केली

बेंगळुरू चेंगराचेंगरी : हायकोर्टाने दिले महत्वपूर्ण निर्देश !

कोविड : देशासाठी मोठा दिलासा

मंगळवारी रद्द करण्यात आलेली काही उड्डाणे:

 दिल्ली ते दुबई – B787-8 ड्रीमलाइनर

AI153 – दिल्ली ते व्हिएन्ना – B787-8

AI143 – दिल्ली ते पॅरिस – B787-8

AI159 – अहमदाबाद ते लंडन – B787-8

AI170– लंडन ते अमृतसर – B787-8

AI133– बेंगळुरू ते लंडन – B787-8

AI179 – मुंबई ते सॅन फ्रान्सिस्को – B777

या बहुतेक रद्द उड्डाणांचे कारण म्हणजे अहमदाबाद अपघातानंतर विमानांची करण्यात आलेली वाढीव सुरक्षा तपासणी होय.

AI171या अपघातग्रस्त फ्लाइटच्या जागी, AI159 हा नवीन फ्लाइट कोड वापरून सोमवारी अहमदाबाद ते लंडन गॅटविक सेवा पुन्हा सुरू करण्यात आली होती. मात्र, मंगळवारी विमान उपलब्ध नसल्यामुळे ती सेवा पुन्हा रद्द करण्यात आली.

Exit mobile version