भूपेश बघेल म्हणाले, आता संपूर्ण देश माझ्या मुलाला ओळखतो!

केंद्र सरकारवर टीका 

भूपेश बघेल म्हणाले, आता संपूर्ण देश माझ्या मुलाला ओळखतो!

छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी केंद्र सरकारवर मोठा हल्ला चढवला आहे आणि म्हटले आहे की, अदानी समूहाकडून कथित बेकायदेशीर वृक्षतोडीचा मुद्दा काँग्रेस विधानसभेत उपस्थित करणार असल्याने अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) त्यांच्या मुलावर कारवाई केली. त्यांनी सांगितले की, त्यांच्या मुलाला जाणूनबुजून लक्ष करण्यात आले आहे.

बघेल यांनी सोमवारी (२१ जुलै)  संसद भवन संकुलात काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली आणि त्यांना त्यांचा मुलगा चैतन्य बघेलच्या अटकेची माहिती दिली. चैतन्यला १८ जुलै रोजी दारू घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने अटक केली होती. ही अटक त्यांच्या वाढदिवशी झाली. पत्रकारांशी बोलताना बघेल म्हणाले, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा त्यांच्या विरोधात आहेत हे मी माझ्या मुलाचे भाग्य मानतो. माझ्या मुलाला कोणीही ओळखतही नव्हते, आता संपूर्ण देशाला माहिती आहे.’

छत्तीसगड दारू घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने १८ जुलै रोजी कारवाई करत भूपेश बघेल यांचा मुलगा चैतन्य बघेल यांना अटक केली. भूपेश बघेल यांच्या मुलाच्या भिलाई येथील निवासस्थानी हा छापा टाकला आणि  त्यांच्यावर कारवाई करत त्यांना ताब्यात घेतले. दरम्यान, चैतन्य बघेल यांना अटक केल्यानंतर रायपूर न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली जी उद्या संपणार आहे.

हे ही वाचा  : 

राज्य परिवहन महामंडळाच्या व्यवस्थापनाला दिली आषाढी एकादशी वारीने गती

७/११,दोन प्रश्न…एसीपी विनोद भट यांनी आत्महत्या का केली? १८९ रेल्वे प्रवाशांचा बळी कुणी घेतला?

छोट्या गावातून आला स्विंगचा जादूगार

आशा भोसले यांनी अनुप जलोटा यांना काय खायला दिले ?

Exit mobile version