‘जम्मू-काश्मीर हल्ल्याचा बदला घेईपर्यंत पुष्पगुच्छ नको!’

केंद्रीय जलशक्ती मंत्री सीआर पाटील कार्यक्रमात पुष्पगुच्छ देण्यास दिला नकार

‘जम्मू-काश्मीर हल्ल्याचा बदला घेईपर्यंत पुष्पगुच्छ नको!’

केंद्रीय जलशक्ती मंत्री सीआर पाटील यांनी शनिवारी (३ मे ) जागतिक गुंतवणूकदार परिषदेत एक मोठे विधान केले. यावेळी त्यांनी कार्यक्रमात पुष्पगुच्छ किंवा स्मृतिचिन्ह स्वीकारण्यास नकार दिला आणि सांगितले की, अलीकडील पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांना न्याय मिळत नाही तोपर्यंत ते स्वागताचे कोणतेही प्रतीक स्वीकारणार नाहीत.

केंद्रीय मंत्र्याचा हा व्हिडीओ देखील व्हायरल झाला आहे. कार्यक्रमातील निवेदक जेव्हा मंत्री सीआर पाटील यांना स्वागतासाठी बोलावतात तेव्हा ते त्यांच्याजवळ जाऊन गुजराती भाषेत म्हणाले, “जोपर्यंत बदला घेतला जात नाही तोपर्यंत स्वागत नाही.” यावेळी केवळ पुष्पगुच्छ घेण्यास आग्रह केला जातो. मात्र, मंत्री पाटील यांनी तेही नाकारले.

मंत्र्यांच्या या भूमिकेमुळे उपस्थित लोकांनी एकच टाळ्या वाजवल्या. कार्यक्रमाला उपस्थित असलेले उद्योगपती अशोक मेहता यांनी एएनआयला पुष्टी दिली की मंत्री पाटील यांनी स्टेजच्या बाहेरही अशीच भावना व्यक्त केली.

हे ही वाचा : 

वायुसेना प्रमुखांनी पंतप्रधान मोदींची घेतली भेट, पाकविरोधी कारवाईला धार

बांगलादेश सीमेलगत आरपीएफने कशी वाढवली गस्त

एनडीएमध्ये जागावाटपावर कोणताही वाद नाही

‘जर भारताने हल्ला केला तर मी इंग्लंडला पळून जाईन’

दरम्यान, पहलगाम हल्ल्यानंतर भारताकडून पाकिस्तानची कोंडी करण्याचा प्रयत्न सुरु आहे. याअगोदर भारताने पाकिस्तानविरुद्ध घेतलेल्या पाच कठोर निर्णयामुळे पाकिस्तान संतापला आहे. यावरून पाक सरकार पोकळ धमक्या देत आहे. भारत कधीही हल्ला करू शकतो अशी भीती पाकिस्तानला आहे.

भारतविरुद्ध गरळ ओकणाऱ्या पाकिस्तानी क्रिकेट पटू, अभिनेते यांचे ट्वीटर खाते बंद करण्यात आले आहेत. इंस्टाग्रामवरील खाते देखील अनेकांचे बंद केले आहेत. पाकिस्तानी अनेक यूट्युब चॅनल देखील बंद केले आहेत.

Exit mobile version