बोरिवलीमध्ये ब्रह्मविद्येचे ऑफलाईन वर्ग

२२ आठवडे भरणार वर्ग

बोरिवलीमध्ये ब्रह्मविद्येचे ऑफलाईन वर्ग

मुंबईतील बोरिवली येथे ब्रह्मविद्येचे वर्ग भरवले जात असून या वर्गातील मार्गदर्शन ऑफलाईन मिळणार आहे. कालपासून या वर्गांना सुरुवात झाली असून २२ आठवडे हे वर्ग असणार आहेत. आठवड्यातून एक दिवस सकाळी ८ ते ९.३० असे वर्ग असणार आहेत.

ब्रह्मविद्येच्या प्राथमिक वर्गाची नवीन ऑफलाईन बॅच बोरिवली येथे सुरू झाली आहे. २२ आठवड्यांच्या कालावधीसाठी मार्गदर्शन केले जाणार असून आठवड्यातून एक दिवस सकाळी ८ ते ९.३० या वेळात वर्ग भरणार आहेत. रविवार, ५ ऑक्टोबरपासून ब्रह्मविद्येचे वर्ग मागाठाणे येथील दत्त पाडा रोडवरील वैश्य समाज हॉल येथे भरले जात आहेत. अजित पोतनीस हे ऑफलाईन वर्गांसाठी मार्गदर्शन करणार आहेत.

हे ही वाचा:

दुर्गा विसर्जन मिरवणुकीदरम्यान झालेल्या हिंसाचारानंतर कटकमध्ये कर्फ्यू

“गाझामधील शांतता योजनेला आणखी विलंब झाल्यास…” ट्रम्प यांनी काय इशारा दिला?

‘चार वेळा दहशतवाद्यांना भेटलो’

पूरस्थितीच्या नुकसानीचा अहवाल पाठवा, मोदी विनाविलंब मदत देणार!

‘ब्रह्मविद्या साधक संघ’ ही एक सेवाभावी संस्था असून तिची स्थापना १९९७ साली प्रमुख विश्वस्त जयंत दिवेकर गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. ब्रह्मविद्येचे शिक्षण, प्रचार आणि प्रसार करणे ही संस्थेची उद्दिष्टे आहेत. ब्रह्मविद्येच्या सरावाने साधकाचा शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक अशी तीनही स्तरांवर विकास होतो.

वर्गाचे तपशील

Exit mobile version