मागील ११ वर्षांत राहुल गांधी निरुपयोगी झालेत, आता कामाच्या शोधात आहेत!

कॉंग्रेसच्या 'फ्रीडम नाईट लाइट मार्च'वरून भाजपाची टीका

मागील ११ वर्षांत राहुल गांधी निरुपयोगी झालेत, आता कामाच्या शोधात आहेत!

‘हर घर तिरंगा’ मोहिमेअंतर्गत भारतीय जनता युवा मोर्चा (BJYM) ने आज (१३ ऑगस्ट) रांचीमध्ये तिरंगा यात्रा काढली. या रॅलीमध्ये एनसीसी कॅडेट्सनीही सहभाग घेतला. या कार्यक्रमाला राज्य भाजप अध्यक्ष बाबूलाल मरांडी, राज्यसभा खासदार आदित्य साहू आणि संघटनमंत्री करमवीर सिंग हेही उपस्थित होते. यावेळी  बाबूलाल मरांडी यांनी कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली.

काँग्रेस पक्षाकडून उद्या (१४ ऑगस्ट) ‘फ्रीडम नाईट लाइट मार्च’चे आयोजन करण्यात आले आहे. कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी काल याची माहिती दिली. ‘मतचोरी’चा आरोप करत सरकार विरोधात हे निषेध आंदोलन असणार आहे.  १४ ऑगस्ट रोजी रात्री ८ वाजता ‘फ्रीडम लाईट नाईट मार्च’ काढण्यात येणार आहे.

दरम्यान, ‘हर घर तिरंगा’ मोहिमेअंतर्गत भारतीय जनता युवा मोर्चा (BJYM) ने रांचीमध्ये तिरंगा यात्रा काढली. कॉंग्रेस १४ ऑगस्टला ‘फ्रीडम नाईट लाइट मार्च’ आयोजित करणार असल्याच्या वृत्तावर झारखंड भाजपचे अध्यक्ष बाबूलाल मरांडी यांनी प्रतिक्रिया दिली.

‘हर घर तिरंगा’ रॅलीचे महत्व सांगताना मरांडी म्हणाले, ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताच्या सैन्याने दाखवलेली वीरता पाहून देश नाहीतर जग देखील अचंबित झाला आहे. आज त्यांच्या सन्मानार्थ देशभरात ‘तिरंगा रॅली’ निघत आहे. यावेळी त्यांना प्रश्न विचारण्यात आला कि कॉंग्रेसकडून उद्या देशभरात रात्री ८ वाजता ‘फ्रीडम नाईट लाइट मार्च’ काढण्यात येणार आहे.

यावर ते म्हणाले- त्यांना काढू द्या, तसे पण त्यांच्याकडे कोणताही रोजगार नव्हताच, या अनुषंगाने त्यांच्यासाठी एक रोजगार निर्माण होईल. काम नसल्याकारणाने मागील ११ वर्षांत राहुल गांधी निरुपयोगी झाले आहेत. जनतेने त्यांना नाकारले आहे. ते आता काम शोधत आहेत.

हे ही वाचा : 

डीआरडीओचा गेस्ट हाऊस मॅनेजर निघाला पाकिस्तानी गुप्तहेर!

बेटिंग अॅप प्रमोशन प्रकरणात सुरेश रैना बुधवारी ईडीसमोर हजर

पुढील महिन्यात पंतप्रधान मोदी ट्रम्प यांना भेटण्याची शक्यता!

ट्रम्प यांनी घातले मंदीचे अंडे, मोदींच्या मंत्र्यांचा आत्मविश्वास शिखरावर |

मतदार यादीत काही गडबड असले तर त्याला सुधारण्याचे काम निवडणूक आयोग करत आहे. निवडणूक आयोगाकडून मतदार यादी सर्व पक्षांना देण्यात आणि यामध्ये काही गडबड असेल किंवा काही सुधार करायचे असतील तर तसे सांगण्यास सांगते. मात्र, राहुल गांधी आणि काँग्रेस पक्ष तसे काही करत नाही, केवळ रस्त्यावर उतरून आंदोलन करत फिरत आहेत, तर त्यांनी तसेच फिरत रहावे, असे मरांडी म्हणाले.

Exit mobile version