राहुल गांधींचे निवडणूक आयोगावर आरोप हे लोकशाहीसाठी घातक!

केंद्रीय मंत्री सुकांत माजूमदार यांची प्रतिक्रिया

राहुल गांधींचे निवडणूक आयोगावर आरोप हे लोकशाहीसाठी घातक!

काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर केलेल्या आरोपांवर केंद्रीय मंत्री सुकांत माजूमदार यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “राहुल गांधी निवडणूक आयोगावर बेछूट आणि चुकीचे आरोप करत आहेत, जे लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहेत.”

मंत्री माजूमदार पुढे म्हणाले, “भारतीय निवडणूक आयोगाकडून एखाद्या राजकीय पक्षाला मान्यता दिली जाते, तेव्हा तो पक्ष आयोगाच्या सर्व नियम व अटी पाळण्याचे वचन देतो. पण आता राहुल गांधी त्याच निवडणूक आयोगावर खोट्या माहिती आणि बनावट कथनांच्या आधारे हल्ले करत आहेत, जे स्वीकारार्ह नाही.”  त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, “लोकशाहीच्या रक्षणासाठी राहुल गांधींनी जनतेसमोर आणि निवडणूक आयोगापुढे माफी मागावी.”

भाजप खासदार सुधांशू त्रिवेदी यांनी देखील पत्रकार परिषद घेत राहुल गांधींच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले. ते म्हणाले, “राहुल गांधी बेंगळुरू सेंट्रल मतदारसंघाचीच माहिती देत आहेत. त्यांनी १ लाख बनावट मतदार असल्याचा आरोप केला आहे. जर ही माहिती निवडणूक आयोगाकडूनच नाही, तर मग त्यांनी ती माहिती कुठून मिळवली?”

सुधांशू त्रिवेदी यांनी पुढे विचारलं की, “राहुल गांधी फक्त त्या भागांचीच उदाहरणं देत आहेत जिथे भाजप आघाडीवर होती. मग चामराजपेट आणि शिवाजीनगर या भागांविषयी का बोलत नाहीत, जिथे काँग्रेसला ६० टक्क्यांहून अधिक मते मिळाली?”

ते पुढे म्हणाले की, “कर्नाटकात काँग्रेसचीच सत्ता आहे. मग मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पत्रकार परिषद घेऊन यावर स्पष्टीकरण का देत नाहीत? जर निवडणूक आयोगावर विश्वास नाही, तर राज्यातील प्रशासन काय करतंय?” सुधांशू त्रिवेदी यांच्या मते, राहुल गांधींचे आरोप निवडक आणि पक्षपाती असून, हे केवळ राजकीय प्रचाराचे साधन आहे.

हे ही वाचा : 

नाशिकच्या रिसॉर्ट मध्ये सीबीआयचे छापे!

”भारतमातेचा अपमान हिंदुस्थान कदापि सहन करणार नाही”

“ऑपरेशन सिंदूरवर प्रश्न म्हणजे पाकिस्तानला ऑक्सिजन देण्यासारखे”

रेल्वे नेटवर्कमध्ये ऑपरेशनल वंदे भारत ट्रेन्सची संख्या १४४ पर्यंत

Exit mobile version