इंडी आघाडीच्या ‘मतदार अधिकार यात्रा’वर निशाणा साधताना केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डी यांनी काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ते म्हणाले, “राहुल गांधी आणि काँग्रेसवर आता कुणाचाच विश्वास राहिलेला नाही. बिहारची जनता जागरूक आहे आणि राहुल गांधींच्या खोट्या आश्वासनांना भुलणार नाही.”
बिहारमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या आईविषयी करण्यात आलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यांवर प्रतिक्रिया देताना रेड्डी म्हणाले, “संपूर्ण देश काँग्रेस पक्षाच्या या वर्तनामुळे संतप्त आहे. बिहारची जनता त्यांना योग्य प्रत्युत्तर देईल आणि लोकशाहीतून त्यांचा निषेध करेल.”
ते पुढे म्हणाले की, “काँग्रेसचा अपमानकारक राजकारणाचा प्रकार जनतेला मान्य नाही. लोकशाहीमध्ये मतदार हे सर्वोच्च आहेत आणि बिहारमध्ये मतदार लवकरच उत्तर देतील.”
दरम्यान, इंडी आघाडीच्या दरभंगा येथे मतदार अधिकार यात्रेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांची आई हीराबेन मोदी यांच्याविरुद्ध आक्षेपार्ह टिप्पणी करण्यात आली होती. या घटनेनंतर भाजपा नेत्यांकडून विरोधकांवर जोरदार टीका करण्यात आली, अजूनही करण्यात येत आहे.
हे ही वाचा :
कृषी अवजारांच्या आडून बनत होती शस्त्रे !
टीसीए कल्याणी यांनी स्वीकारला महालेखा नियंत्रक पदाचा कार्यभार
आयएमसी २०२५ फक्त ५ जी एआयबद्दल नाही
सोमय्या यांच्यावर सिल्लोडमध्ये हल्ला, इस्लामी कट्टरपंथीयांचे कृत्य असल्याचा आरोप
या टिप्पणीच्या आरोपाखाली बिहारमधील दरभंगा येथील पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली होती. मोहम्मद रिझवी उर्फ राजा असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याला शुक्रवारी (२९ ऑगस्ट) न्यायालयात हजर करण्यात आले असता कोर्टाने त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.
#WATCH | Patna, Bihar | On the Mahagathbandhan's 'Voter Adhikar Yatra', Union Minister G. Kishan Reddy says, "No one trusts Rahul Gandhi and Congress. The public of Bihar is aware and will not believe the lies of Rahul Gandhi"
On derogatory remarks against PM Modi and his mother… pic.twitter.com/8tgAr4w5Hh
— ANI (@ANI) September 1, 2025
