भारत-पाक सामन्याला विरोध, मंत्री रिजिजू यांनी सुनावले!

विरोधकांनी सामना रद्द करण्याची केली होती मागणी 

भारत-पाक सामन्याला विरोध, मंत्री रिजिजू यांनी सुनावले!

दुबई येथे झालेल्या आशिया चषक सामन्यात भारतीय क्रिकेट संघाने पाकिस्तानविरुद्ध शानदार विजय मिळवला. दरम्यान, या सामन्याच्या पार्श्वभूमीवर काही विरोधी पक्ष आणि त्यांच्या समर्थकांकडून वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या होत्या. हा सामना होवू नये अशी विरोधकांची इच्छा होती तर अनेक जणांनी आरोप केला कि हा सामना फिक्सिंग होता. या कालच्या भारत विरुद्ध पाकिस्तान आशिया कप सामन्यावर किरेन रिजिजू यांचे स्पष्टीकरण दिलं आहे.

केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी यावर आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितले, “हा सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यातील कोणताही द्विपक्षीय सामना नव्हता. आशिया कप ही बहुराष्ट्रीय स्पर्धा आहे. जर भारत या स्पर्धेत भाग घेतला नसता, तर त्याचं नुकसान भारतालाच झालं असतं. ऑलिंपिक, आशिया कप, आशियाई क्रीडा स्पर्धा किंवा वर्ल्ड कप यांसारख्या स्पर्धा कोणत्याही एका देशासाठी नसतात, त्या संपूर्ण जगासाठी असतात.”

रिजिजू पुढे म्हणाले,”भारताने पाकिस्तानसोबत कोणताही स्वतंत्र द्विपक्षीय सामना खेळलेला नाही. पाकिस्तानमध्ये भारताने आजवर कोणताही सामना खेळलेला नाही, आणि पाकिस्तानलाही स्वतंत्रपणे आमंत्रित करण्यात आलेलं नाही.” जर आपण एखाद्या देशाशी शत्रुत्वामुळे ऑलिंपिकमध्ये सहभागी झालो नाही, तर त्याचं नुकसान आपल्यालाच होईल. त्यामुळे भावना योग्य असल्या तरी त्यामागे तर्कशुद्ध विचारसरणी असणं आवश्यक आहे.”

हे ही वाचा : 

यूपीची ‘विकसित यूपी ॲट २०४७’ या व्हिजनकडे वाटचाल

युट्यूबर मणी मेराजने महिला इन्फ्लुएन्सरला फसवले, आता दुसरे लग्न करण्याच्या तयारीत!

सीमेवर नेपाळहून पळालेल्या चार परदेशी कैद्यांना अटक

“नेहरूंच्या अकार्यक्षमतेमुळे ईशान्य भारत चीनच्या ताब्यात गेला असता”

त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, “भारत पाकिस्तानसोबत स्वतंत्रपणे द्विपक्षीय सामना खेळत नाही. मात्र ऑलिंपिक, आशियाई क्रीडा स्पर्धा, आशियाई अजिंक्यपद स्पर्धा, वर्ल्ड कप आणि आशिया कप या सर्व बहुपक्षीय स्पर्धा आहेत. यात सर्व देश एकत्र खेळतात. त्यामुळे भारत-पाकिस्तान यांच्यात कोणताही वेगळा किंवा खास सामना खेळला जात नाही.”

Exit mobile version