१३० अणुबॉम्ब भारतासाठी ठेवलेत…

पाकिस्तानचे रेल्वेमंत्री हनीफ अब्बासी यांची धमकी

१३० अणुबॉम्ब भारतासाठी ठेवलेत…

पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने घेतलेल्या कठोर निर्णयामुळे पाकिस्तान संतापला आहे. पाकिस्तानच्या पंतप्रधानांसह अनेक नेते दररोज भारताविरुद्ध भडकाऊ विधाने करत आहेत. पंतप्रधान शाहबाज शरीफ, पीपीपी नेते बिलावल भुट्टो यांच्यानंतर आता पाकिस्तानचे रेल्वेमंत्री हनीफ अब्बासी यांनी भारताला अणुहल्ल्याची धमकी दिली आहे. रावळपिंडी येथे पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले की, जर भारताने पाकिस्तानचे पाणी थांबवले तर आम्ही त्याला योग्य उत्तर देऊ.

पत्रकार परिषदेत कडक भूमिका घेत हनीफ अब्बासी म्हणाले, ‘आपली सर्व क्षेपणास्त्रे आता भारताकडे वळली आहेत, जर भारताने कोणत्याही प्रकारचे दुष्प्रयास करण्याचा निर्णय घेतला तर त्याला त्याची मोठी किंमत मोजावी लागेल.’ आमच्याकडे जगातील सर्वात शक्तिशाली अणुबॉम्ब आहे आणि आम्ही आमची ‘गोरी’, ‘शाहीन’, ‘गझनवी’ सारखी क्षेपणास्त्रे आणि १३० अणुबॉम्ब फक्त भारतासाठी ठेवले आहेत. ते पुढे म्हणाले, राजनैतिक प्रयत्नांसोबतच, आम्ही आमच्या सीमांच्या सुरक्षेसाठी पूर्ण तयारी केली आहे.

हे ही वाचा : 

इराणच्या शाहिद राजाई बंदरात स्फोट; ५०० हून अधिक लोक जखमी

हिंदूंनो, तुमचा गजनी झाला असेल तर ही विधाने अंगाखांद्यावर लिहून ठेवा…

संरक्षण मोहिमा, सुरक्षा दलांच्या हालचालींचे थेट प्रक्षेपण दाखवू नका!

निरपराध हिंदुच्या सत्यनिष्ठेची कहाणी सांगणाऱ्या ‘दाभोळकरहत्या आणि मी’ पुस्तकाचे प्रकाशन

पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो यांनीही एका जाहीर सभेत भारताला धमकी दिली होती. मंत्री बिलावल भुट्टो म्हणाले, “सिंधू आमची आहे आणि आमचीच राहील. आमचे पाणी त्यातून वाहील किंवा त्यांचे रक्त वाहील.”

पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करत भुट्टो म्हणाले की, पाकिस्तान किंवा आंतरराष्ट्रीय समुदाय त्यांच्या युद्ध भडकवण्याच्या किंवा सिंधू नदीचे पाणी वळवण्याच्या प्रयत्नांना सहन करणार नाही. ते (मोदी) म्हणतात की ते हजारो वर्षे जुन्या संस्कृतीचे वारस आहेत, परंतु ती संस्कृती मोहेंजोदारो, लरकाना येथे आहे. आम्ही तिचे खरे संरक्षक आहोत आणि आम्ही तिचे रक्षण करू, असे भुट्टो म्हणाले.

Exit mobile version