पंतप्रधान मोदींनी दिवंगत माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्या कुटुंबाची घेतली भेट!

घटनास्थळाची पाहणी, जखमी लोकांची आणि बचावलेल्या प्रवाशाची घेतली भेट

पंतप्रधान मोदींनी दिवंगत माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्या कुटुंबाची घेतली भेट!

अहमदाबाद विमान अपघातानंतर पंतप्रधान मोदी आज घटनास्थळी पोहोचले. येथे त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी विमान अपघातात मृत्युमुखी पडलेल्या रमेश विश्वास कुमार यांचीही भेट घेतली आणि विचारपूस केली. या दुर्घटनेत मृत्यू पावलेल्यांमध्ये गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचा देखील समावेश होता. यावेळी पंतप्रधान मोदींनी त्यांच्या कुटुंबाची भेट घेतली आणि शोक व्यक्त केला.

पंतप्रधान मोदींनी एक्सवर पोस्टकरत म्हटले, “विजयभाई रुपाणीजींच्या कुटुंबाची भेट घेतली. विजयभाई आपल्यात नाहीत हे अनाकलनीय आहे. मी त्यांना अनेक दशकांपासून ओळखतो. आम्ही सर्वात आव्हानात्मक काळातही खांद्याला खांदा लावून काम केले. विजयभाई नम्र आणि कष्टाळू होते, पक्षाच्या विचारसरणीशी पूर्णपणे समर्पित होते. पदावर येऊन त्यांनी संघटनेत विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या आणि गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून तत्परतेने काम केले.

विमान अपघातातील एकमेव वाचलेले विश्वास कुमार रमेश यांची पंतप्रधान मोदींनी रुग्णालयात भेट घेतली आणि घटनेबद्दल विचारपूस केली. पंतप्रधान मोदींनी विचारले की हे सर्व कसे घडले? यावर विश्वास कुमार म्हणाले की, माझ्या डोळ्यासमोर सर्व काही घडले. मी जिवंत बाहेर कसा आलो यावर माझा स्वतःचा विश्वासच बसत नाही. काही वेळ मला वाटले की मीही मरणार आहे.

हे ही वाचा : 

शनी शिंगणापूर देवस्थानातून ११४ मुस्लिम कर्मचाऱ्यांची हकालपट्टी!

डाव्या विचारधारेतील आणखी एक ‘माफीवीर’

मुंबईतील पोलिस निरीक्षकांच्या त्या बदल्यांवर ‘मॅट’चे प्रश्नचिन्ह

कीवीची कमाल! आरोग्याची खास काळजी घेणारा फळ

पण जेव्हा मी माझे डोळे उघडले तेव्हा मला आढळले की मी जिवंत आहे. त्यानंतर मी सीट बेल्ट उघडला आणि बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. मग मी बाहेर आलो. माझ्या डोळ्यासमोर विमानात उपस्थित असलेल्या एअर होस्टेस, शेजारील प्रवासी क्षणात सर्व गायब झाले. दरम्यान, या दुर्घटनेत २६५ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी २४१ जण विमानात प्रवासी आणि क्रू मेंबर्स होते. मृतांमध्ये ५ जण विमान कोसळलेल्या वैद्यकीय वसतिगृहातील आहेत.

Exit mobile version