पूनम पांडे मंदोदरीची भूमिका साकारणार नाही!

लव कुश रामलीला समितीचा निर्णय

पूनम पांडे मंदोदरीची भूमिका साकारणार नाही!

देशभरात नवरात्रीचा उत्सव सुरू असून जुन्या दिल्लीतील लाल किल्ला मैदानावर आयोजित केलेल्या रामलीला संदर्भात नवी माहिती समोर आली आहे. लव कुश रामलीला समितीने आयोजित केलेल्या रामलीलेत पूनम पांडे आता मंदोदरीची भूमिका साकारणार नसल्याचे समोर आले आहे. भूमिकेसाठी तिचे नाव निश्चित झाल्यापासूनच तीव्र विरोध करण्यात येत होता. या पार्श्वभूमीवर, लव कुश रामलीला समितीने अखेर तिचे नाव वगळल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे पूनम पांडे आता मंदोदरी साकारणार नाही.

लोकप्रिय रामलीलाच्या आयोजक सदस्यांनी समितीच्या निर्णयाची घोषणा करण्यासाठी एक परिषद आयोजित केली होती. पूनम पांडे हिला भूमिका दिल्यापासून सर्वच स्तरांवरून आक्षेप नोंदवला गेला होता. अखेर सविस्तर विचारविनिमयानंतर, समितीने एकमताने निर्णय घेतला की, मंदोदरीची (रामायणातील रावणाची पत्नी) भूमिका या वर्षी दुसऱ्या कलाकाराने साकारावी.

रामलीला आयोजन समितीचे अध्यक्ष अर्जुन कुमार आणि सरचिटणीस सुभाष गोयल यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, “पूनम पांडे यांनी सुरुवातीला समितीच्या निमंत्रणावरून मंदोदरीची भूमिका साकारण्यास सहमती दर्शविली होती. मात्र, त्यांचे नाव जाहीर झाल्यानंतर, अनेक संस्था आणि गटांनी आक्षेप घेतले, ज्यामुळे समितीच्या मते, रामलीलेचा मुख्य उद्देश – भगवान श्री रामाचा संदेश समाजात पोहोचवण्याच्या उद्देशाला अडथळा येऊ शकतो.”

हेही वाचा..

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या बळीराजाला २२१५ कोटींची मदत

‘काँग्रेसच्या अहंकारी मानसिकतेचे खळबळजनक वास्तव उघड’

“… अशा भाषेची गरज नाही!” शशी थरूर संतापले!

आयुष्मान भारत योजनेची सात वर्षे पूर्ण

समितीने पूनम पांडेला भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत आणि आशा व्यक्त केली आहे की ती त्यांचा निर्णय समजून घेईल आणि स्वीकारेल. दरम्यान, अभिनेत्रीने अलीकडेच तिच्या इंस्टाग्रामवर अपलोड केलेल्या व्हिडिओ संदेशात घोषणा केली होती की ती ही भूमिका साकारण्यास उत्सुक आहे आणि स्वतःला शुद्ध करण्याच्या प्रक्रियेत, नवरात्रीचे सर्व नऊ दिवस उपवास करण्याचा निर्णय घेतला आहे.

Exit mobile version