११ जुलैपासून देशात पवित्र श्रावण महिना सुरू होणार आहे. या काळात कावड यात्रा काढली जाईल. ४ कोटींहून अधिक कावडीय हरिद्वारहून जल्लोषात पाणी भरण्यासाठी निघतील. पण कावड यात्रा सुरू होण्यापूर्वीच वाटेत असलेल्या ढाबे आणि हॉटेल्सच्या जेवणाबाबत आणि ओळखीबाबत वातावरण तापले आहे. मुझफ्फरनगरमधील ओळखीच्या वादानंतर, हिंदू महासभेने बरेलीमध्ये पोस्टर मोहीम सुरू केली आहे. प्रत्यक्षात, हिंदू महासभेचे लोक ढाबे, हॉटेल्स आणि गाड्यांवर ‘मी हिंदू आहे’ असे पोस्टर लावत आहेत. धर्म लपवून कोणीही दुकान चालवू शकणार नाही असा संघटनेचा दावा आहे. त्याच वेळी, कावड यात्रेबाबत प्रशासन पूर्णपणे सतर्क आहे. कावड मार्गावरील हॉटेल्स, ढाबे आणि रेस्टॉरंट्सबाबत प्रशासनही खूप सतर्क आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी स्पष्ट केले आहे की, गैरकृत्य करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल.
या विषयावर यशवीर महाराजांनी लोकांना सांगितले की, ‘आपल्या सनातन धर्मातील हॉटेल्स, ढाबे, चहाची, मिठाईची, आणि ज्यूसची दुकाने आहेत त्यांनी दुकानावर भगवान वराह यांचे चित्र आणि भगवा झेंडा लावावा. यामुळे सनातन धर्मातील लोकांना आणि कानवड आणणाऱ्या शिवभक्तांना संदेश जाईल की तुम्ही फक्त तिथेच जेवा जिथे भगवान वराह यांचे चित्र, भगवा झेंडा आणि सनातन धर्मातील लोकांचे नाव ठळक अक्षरात लिहिलेले असेल. जिथे भगवान वराह यांचे चित्र असेल, तिथे थुंकणारी आणि लघवी करणारी कोणतीही टोळी नाही हे समजून घ्या. याठिकाणी फक्त सनातन धर्मातील लोकांचीच अन्नाची दुकाने असल्याचे माहिती होईल.
दरम्यान, गेल्या वर्षी श्रावण महिन्यात फळांच्या दुकानांच्या मालकांना, हॉटेलचालकांना, ढाब्यांच्या मालकांना आणि चहा दुकानांच्या मालकांना त्यांच्या दुकानांसमोर त्यांची नावे लिहिण्यास सांगण्यात आले होते, जेणेकरून कावडीयांना हे माहिती होईल कि ही दुकाने कोणाची आहेत.
हे ही वाचा :
सक्तीने किंवा आमिषाने होणाऱ्या धर्मांतरणासाठी कायदा आवश्यक!
बंदवर मुख्तार अब्बास नकवी काय म्हणाले ?
अमरनाथ यात्रा : सीआरपीएफ महानिदेशकांनी केली सुरक्षेची पाहणी
…हे वर्तन अशोभनीय! सत्तेचा गैरवापर आमदार करतात असा संदेश जातो!
कावड यात्रा कधी सुरू?
११ जुलैपासून देशात श्रावण महिना सुरू होत आहे. यासोबतच ११ जुलैपासूनच कावड यात्रा सुरू होईल. ही कावड यात्रा २३ जुलैपर्यंत सुरू राहील. या काळात कावडीय लोक हरिद्वारहून गंगाजल घेऊन त्यांच्या गावातील मंदिरात जातील, जिथे ते भगवान शिवाचा जलाभिषेक करतील. या वर्षीच्या कांवड यात्रेसाठी प्रशासनाने चोख तयारी केली आहे, तर भाविकांनीही धार्मिक शिस्त आणि संयमी वर्तन पाळण्याचे आवाहन केले आहे.
