उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते केशव प्रसाद मौर्य यांनी बुधवारी काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली. राहुल गांधी सातत्याने ‘पाकिस्तान चालीसा’ म्हणतात, असा आरोप त्यांनी केला. ग्रेटर नोएडामधील दादरी विधानसभा क्षेत्रातील अकिलपूर गावात झालेल्या एका जनसभेला संबोधित करताना केशव मौर्य म्हणाले, मी पाहिलं आहे की राहुल गांधी नेहमी ‘पाकिस्तान चालीसा’ म्हणत असतात. ज्या प्रकारे पाकिस्तानी लष्कर आणि तिथले प्रवक्ते बोलत होते की पंतप्रधान मोदींनी ट्रम्पच्या सांगण्यावरून सीझफायर केलं, मी त्यांना सांगू इच्छितो की आज पंतप्रधानांना डोनाल्ड ट्रम्प यांचा फोन आला. पंतप्रधान मोदींनी स्पष्टपणे सांगितले की भारत आणि पाकिस्तान यांच्यात कोणत्याही दलालाची गरज नाही. पाकिस्तानला त्याची जागा दाखवण्याची ताकद भारतात आहे.
ते पुढे म्हणाले, “राहुल गांधी मुस्लिम तुष्टीकरणाच्या राजकारणात गुंतले आहेत आणि गरिबांचे शोषण करतात. ते ६० वर्षे सत्तेत होते, पण महिलांना त्यांचे हक्क दिले नाहीत. मी इथल्या जनतेला विचारू इच्छितो – काँग्रेसने देशात ६० वर्षे सत्ता चालवली, पण कधी त्यांनी जातनिहाय जनगणनेचा विचार केला का? मात्र नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर ते लगेच जात जनगणनेची मागणी करू लागले. मी स्पष्टपणे सांगतो की पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारने जेवढं काम केलं, तेवढं काँग्रेसने ६० वर्षांत केलं नाही.”
हेही वाचा..
काँग्रेसने देशातील जनतेची माफी मागावी
पाकिस्तानच्या बलुचिस्तानमध्ये स्फोटानंतर काय घडलं ?
२०२६ महिला टी२० विश्वचषकात भारताची टक्कर पाकिस्तान-ऑस्ट्रेलियाशी!
विकेट घेण्याबाबत भारताची कटिबद्धता – गिलसाठी पहिली खरी कसोटी!
उपमुख्यमंत्री मौर्य यांनी पुढे सांगितले, “२०१४ मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान होण्यापूर्वी देश पूर्णपणे निराशेच्या गर्तेत होता. भ्रष्टाचार, घोटाळे यांनी देश वेढलेला होता. कोणाच्याही मनात भारत प्रगती करेल, अशी कल्पना नव्हती. पण तुम्ही सर्वांनी कमळाचं बटन दाबून, ५६ इंचाच्या छातीच्या एका गरीब माणसाला पंतप्रधान बनवलं. ज्यांनी भारताच्या तिरंग्याचा सन्मान संपूर्ण जगात पोहोचवला.”
