पुण्यात सरफराजच्या वादळासमोर राजस्थान गारद

पुण्यात सरफराजच्या वादळासमोर राजस्थान गारद

सय्यद मुस्ताख अली ट्रॉफी स्पर्धेत आयपीएल २०२६ च्या मिनी लिलावापूर्वी सरफराज खानने जोरदार शक्तीप्रदर्शन करत आपली दावेदारी ठसठशीतपणे मांडली आहे. राजस्थानविरुद्ध अवघ्या २२ चेंडूत ७३ धावांची स्फोटक खेळी करत सरफराजने मुंबईला मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना ३ गडी राखून थरारक विजय मिळवून दिला.

पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात मुंबईचा कर्णधार शार्दुल ठाकूर याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. राजस्थानने निर्धारित २० षटकांत ४ बाद २१६ धावा केल्या.

राजस्थानकडून

२१७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईला चौथ्या षटकाच्या अखेरीस यशस्वी जैस्वाल (१५ धावा) बाद झाल्याने धक्का बसला. मात्र त्यानंतर मैदानावर अवतरलेला सरफराज खान म्हणजे जणू वादळच!

अजिंक्य रहाणेसोबत तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरलेल्या सरफराजने राजस्थानच्या गोलंदाजांची अक्षरशः धुलाई केली.
सरफराजने २२ चेंडूत ७ षटकार आणि ६ चौकारांसह ७३ धावा ठोकल्या. विशेष म्हणजे, त्याने केवळ १५ चेंडूत अर्धशतक झळकावत टी-२० कारकिर्दीतील आपले सर्वात जलद अर्धशतक पूर्ण केले. रहाणेसोबत दुसऱ्या विकेटसाठी १११ धावांची तडाखेबंद भागीदारी करत त्याने विजयाचा पाया रचला.

अजिंक्य रहाणे — ४१ चेंडूत ७२* धावा (३ षटकार, ७ चौकार)
अथर्व आंकोलेकर — ९ चेंडूत २६ धावा (३ षटकार, १ चौकार)

मुंबईने १८.१ षटकांत ७ बाद २१७ धावा करत सामना आपल्या नावावर केला.
मागील आयपीएल लिलावात अनसोल्ड राहिलेल्या सरफराजसाठी ही खेळी आयपीएल २०२६ मिनी लिलावाच्या दृष्टीने अत्यंत निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.

Exit mobile version