नेपाळ तुरुंगातून फरार ६० कैद्यांना सशस्त्र सीमा बलाने केली अटक!

भारत-नेपाळ सीमेवरील नाक्यांवर कारवाई

नेपाळ तुरुंगातून फरार ६० कैद्यांना सशस्त्र सीमा बलाने केली अटक!

नेपाळच्या तुरुंगातून पळून गेलेल्या ६० कैद्यांना सशस्त्र सीमा बल (SSB) ने अटक केली आहे. हे सर्व कैदी भारत-नेपाळ सीमेवरील वेगवेगळ्या चेकपोस्टवर पकडले गेले असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. अधिकार्‍यांनी सांगितले की, एसएसबीने तात्काळ पावले उचलत सिमा सुरक्षेसाठी सतर्कता वाढवली होती आणि या कारवाईदरम्यान ६० फरार कैद्यांना वेगवेगळ्या ठिकाणी शोधून काढले. पकडण्यात आलेल्या सर्व कैद्यांना स्थानिक पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

नेपाळमध्ये हिंसाचार सुरु झाल्यानंतर भारत-नेपाळ सीमेवर सुरक्षा दलाला अलर्टमोडवर ठेवण्यात आले आहे. सीमावर्ती भागात गस्त आणि तपासणी वाढवण्यात आली आहे. सुरक्षा दलाने चोख कामगिरी बजावत अशा घुसखोरांना पकडले. मिळालेल्या माहितीनुसार, नेपाळमध्ये हिंसाचार दरम्यान तब्बल १५,००० कैदी तुरुंगातून फरार झाले आहेत.

याच दरम्यान, जनरल-झेड नेते दिवाकर दंगल यांची वक्तव्य समोर आले आहे. ते म्हणाले, “आम्ही नेतृत्व स्वीकारण्यास सक्षम नाही आणि नेतृत्व स्वीकारण्यासाठी पुरेसे परिपक्व होण्यासाठी आम्हाला वेळ लागेल. आम्हाला तोडण्याचे प्रयत्न केले जात आहेत. पक्षातील काही सदस्यांना असा गैरसमज आहे की ते घुसखोरी करू शकतात आणि फूट निर्माण करू शकतात. हा रक्तपात तुमच्यामुळे (जुन्या नेत्यांमुळे) होत आहे. जर लोकांनी रक्तपात सुरू केला तर ते टिकणार नाहीत. आम्हाला रक्तपात नको आहे. आम्हाला संसद बरखास्त करायची आहे, पण संविधान रद्द करायचे नाही.”

हे ही वाचा :

मेंदू खाणाऱ्या अमीबामुळे आणखी एकाचा मृत्यू 

चंदन तस्करांचा धुमाकूळ

तर जनरल-झेड नेते अनिल बानिया म्हणाले, “जुन्या नेत्यांना कंटाळून आम्ही हे आंदोलन केले. आम्ही शांततेत निषेधाचे आवाहन केले होते, परंतु राजकीय कार्यकर्त्यांनी जाळपोळ केली आणि नंतर पायाभूत सुविधांची तोडफोड केली. ऑनलाइन सर्वेक्षणांद्वारे जनरल-झेड नेत्यांनी सुशीला कार्की यांना मतदान केले. आम्ही संविधान बदलण्याचा प्रयत्न करत नाही आहोत, परंतु त्यात आवश्यक बदल करू. ६ महिन्यांच्या आत, आम्ही निवडणुकीला सामोरे जाऊ…”

Exit mobile version