‘पिंक बॉल टेस्ट’मध्ये हॅटट्रिक करणारा जगातील एकमेव गोलंदाज!

‘पिंक बॉल टेस्ट’मध्ये हॅटट्रिक करणारा जगातील एकमेव गोलंदाज!

ऑस्ट्रेलियाचा जलदगती गोलंदाज स्कॉट बोलंड याने क्रिकेट इतिहासात अनोखा विक्रम आपल्या नावे केला आहे. तो ‘पिंक बॉल टेस्ट’ सामन्यात हॅटट्रिक घेणारा जगातील पहिलाच गोलंदाज ठरला आहे. वेस्ट इंडीजविरुद्ध जमैका येथील तिसऱ्या कसोटी सामन्यात त्याने ही कामगिरी केली.

दुसऱ्या डावातील १४व्या ओव्हरमध्ये बोलंडने सलग तीन चेंडूंवर तीन गडी बाद करत हॅटट्रिक पूर्ण केली.
▪️ पहिल्या चेंडूवर जस्टिन ग्रीव्स झेलबाद
▪️ दुसऱ्या चेंडूवर शमर जोसेफ पायचीत
▪️ तिसऱ्या चेंडूवर जोमेल वॉरिकन क्लीन बोल्ड

यासह बोलंड टेस्ट क्रिकेटमध्ये हॅटट्रिक करणारा १०वा ऑस्ट्रेलियन गोलंदाज देखील ठरला आहे.

वेस्ट इंडीजचा धक्का – फक्त 27 धावा!

बोलंडने या डावात केवळ २ ओव्हरमध्ये २ धावा देत ३ बळी घेतले. दुसऱ्या बाजूने मिचेल स्टार्क ने 7.3 ओव्हरमध्ये ९ धावा देत ६ गडी बाद केले. त्यांच्या या धडाकेबाज कामगिरीपुढे वेस्ट इंडीजचा संपूर्ण संघ फक्त २७ धावांत गारद झाला – जो टेस्ट क्रिकेट इतिहासातील दुसरा सर्वात कमी डाव ठरला आहे.

सामन्याचा संक्षिप्त आढावा:

ऑस्ट्रेलियाने सामना १७६ धावांनी जिंकत मालिकेत ३-० अशी निर्भेळ विजयी घौडदौड केली. यानंतर दोन्ही संघांत २० ते २८ जुलैदरम्यान ५ टी२० सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे.

Exit mobile version