शेफाली वर्माची दणदणीत कामगिरी

शेफाली वर्माची दणदणीत कामगिरी

वनडे विश्वचषक २०२५ मध्ये भारताला विजेतेपद मिळवून देताना निर्णायक कामगिरी करणारी भारतीय संघाची आक्रमक सलामीवीर शेफाली वर्मा हिला आयसीसीकडून नव्हेंबर महिन्याच्या ‘श्रेष्ठ महिला खेळाडू’ पुरस्कारासाठी नामांकन जाहीर झाले आहे. तिच्यासोबत यूएईची ईशा ओजा आणि थायलंडची थिपाचा पुथावोंग यांचाही समावेश आहे. शेफालीला हा पुरस्कार मिळण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.

विश्वचषकात सुरुवातीला भारतीय संघात स्थान नसलेल्या शेफालीला, सेमीफायनलपूर्वी प्रतीका रावल जखमी झाल्याने संघात संधी मिळाली. सेमीफायनलमध्ये तिचा फॉर्म चमकला नाही; पण फायनलमध्ये तिने इतिहास रचला.

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध २ नोव्हेंबरला झालेल्या अंतिम सामन्यात शेफालीने केवळ फलंदाजीतच नव्हे तर गोलंदाजीतही चमक दाखवली.
तिने ७८ चेंडूत ८७ धावा ठोकत आक्रमक सलामी दिली आणि नंतर गोलंदाजीत २ विकेट घेत भारताला विश्वविजेतेपद मिळवून दिले. या शानदार कामगिरीमुळे तिला ‘नव्हेंबर महिन्याच्या सर्वोत्तम महिला खेळाडू’ पुरस्काराची प्रबळ दावेदार मानले जात आहे.

फायनलमधील अविस्मरणीय कामगिरीसाठी शेफालीला प्लेअर ऑफ द मॅच हा बहुमान मिळाला होता.

थायलंडच्या स्पिनर थिपाचा पुथावोंग हिने ICC Women’s Emerging Nations Trophy मध्ये १५ विकेट घेत सर्वाधिक बळी घेतले. स्कॉटलंडविरुद्धच्या अंतिम सामन्यात तिने ४.२५ इकॉनमीने चार विकेट घेतल्या.

यूएईची ऑलराउंडर ईशा ओजा हिने याच स्पर्धेत सात टी२० सामन्यांत १८७ धावा आणि ७ विकेट घेतल्या. नामिबियाविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात तिने ६८ धावा आणि २ विकेट देत निर्णायक योगदान दिले.

Exit mobile version