गुप्तवार्ता विभागाचे आयुक्त शिरीष जैन यांना राष्ट्रपती पदक

मुंबई पोलीस दलाचा बहुमान: स्वातंत्र्यदिनानिमित्त राष्ट्रपती व गुणवत्तापूर्ण पदके

गुप्तवार्ता विभागाचे आयुक्त शिरीष जैन यांना राष्ट्रपती पदक

स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर उल्लेखनीय व निष्कलंक सेवेची दखल घेत केंद्र सरकारतर्फे पोलीस अधिकारी आणि अंमलदारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. यात मुंबई पोलीस दल तसेच मुंबईत कार्यरत असलेल्या राज्याच्या विविध विभागांमधील कर्तबगार अधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला असून, त्यांच्या या दैदिप्यमान कामगिरीमुळे पोलीस दलाची मान उंचावली आहे.

महाराष्ट्र पोलीस महासंचालक कार्यालयाने जाहीर केलेल्या यादीनुसार, मुंबईच्या दृष्टीने अत्यंत अभिमानास्पद बाब म्हणजे राज्य गुप्तवार्ता विभागाचे आयुक्त शिरीष रविंद्र जैन यांना त्यांच्या उत्कृष्ट व उल्लेखनीय सेवेसाठी ‘राष्ट्रपतींचे उल्लेखनीय सेवेचे पदक’ जाहीर झाले आहे.

मुंबई पोलीस दलाचा गौरव

मुंबईच्या सुरक्षिततेची आणि कायदा-सुव्यवस्थेची धुरा सांभाळणाऱ्या खालील अधिकारी व अंमलदारांना त्यांच्या कर्तव्यतत्परतेबद्दल ‘गुणवत्तापूर्ण सेवेचे पदक’ प्रदान करून गौरविण्यात आले आहे:
* प्रविण विनायक तेजाळे (सहायक पोलीस आयुक्त, मुंबई)
* जनार्दन यशवंत देसाई (पोलीस उपनिरीक्षक, मुंबई)
* दीपक अनंत ढुमणे (पोलीस उपनिरीक्षक, मुंबई)
* प्रकाश बळीराम कदम (पोलीस उपनिरीक्षक, मुंबई)
* अंकुश बाबालाल न्यायनिर्गुणे ( पोलीस उपनिरीक्षक, मुंबई)
* भरत विभमाजी गोहिल (पोलीस हवालदार, द.वि.प., मुंबई)

हे ही वाचा:

भारत इटली संबंध दृढच!

भूतकाळ पुसण्याची गरज काय? कुछ तो है जिसकी पर्दादारी है…

मिचेल स्टार्कने मोडला कपिल देव विक्रम

स्वातंत्र्यदिनी दिल्ली मेट्रो पहाटे ४ वाजल्यापासून धावणार!

एकिकडे मुंबईच्या आर्थिक राजधानीत गुप्तवार्ता, गुन्हे तपास आणि नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी लीलया पार पाडणाऱ्या अधिकाऱ्यांचा गौरव झाला आहे, तर दुसरीकडे नक्षलग्रस्त भागांत प्राणांची बाजी लावून कर्तव्य बजावणाऱ्या प्राणहिता, अहेरी येथील पोलीस अधिकारी व जवानांच्या शौर्याचीही केंद्राने गंभीर व कौतुकास्पद दखल घेतली आहे. या सर्व पुरस्कारांमुळे महाराष्ट्रातील पोलीस दलाच्या पाठीवर कौतुुकी कौतुकाची थाप पडली असून पोलीस वर्तुळातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Exit mobile version