शिवाजीनगर मेट्रो स्थानकाचे नामांतर?, कर्नाटक सरकारच्या चर्चेवर अतुल लोंढेंचा खुलासा!

फडणवीसांनी कर्नाटक काँग्रेसवर केली होती टीका

शिवाजीनगर मेट्रो स्थानकाचे नामांतर?, कर्नाटक सरकारच्या चर्चेवर अतुल लोंढेंचा खुलासा!

बंगळुरूमधील शिवाजीनगर मेट्रो स्थानकाचे नाव सेंट मेरी यांच्यावरून ठेवण्याच्या चर्चांवर महाराष्ट्रात प्रतिक्रिया उमटल्या आहेत. यावर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे पाटील यांनी खुलासा केला आहे की, “रेल्वे मंत्रालय हे केंद्र सरकारच्या अखत्यारीत येते. आम्ही बेंगळुरू मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (BMRCL) चे व्यवस्थापकीय संचालक एम. रविशंकर यांच्याशी याबाबत संपर्क साधला होता. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, अशा कोणत्याही नामांतराचा प्रस्ताव, चर्चा किंवा विचारही झालेला नाही.”

लोंढे पुढे म्हणाले, “महाराष्ट्र सरकारच्या वतीने आमची मागणी आहे की, जर नामांतर करायचेच असेल, तर शिवाजीनगर आणि बांबू बाजार या दोन्ही मेट्रो स्थानकांची नावे छत्रपती शिवाजी महाराज मेट्रो स्थानक अशी करण्यात यावीत.”

दरम्यान, कर्नाटक सरकारने बंगळुरुमधील शिवाजी नगर मेट्रो स्टेशनचे नामांतर करुन सेंट मेरी करण्याची शिफारस केली असल्याची बातमी नुकतीच समोर आली होती. ही बातमी समोर येताच भाजपने हा हिंदूचा अवमान असल्याचे म्हटले आणि काँग्रेस सरकारवर राजकीय स्वार्थासाठी मराठा आदर्शाचा अपमान केल्याचा आरोप केला.

शिवाजीनगर येथील सेंट मेरी बॅसिलिका येथे नुकत्याच झालेल्या एका समारंभात बोलताना मुख्यमंत्री सिद्धरमया यांनी सांगितले की, त्यांनी केंद्राला शिफारस केली आहे की येणाऱ्या स्टेशनला सेंट मेरीचे नाव द्यावे. 

दरम्यान, यावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर निशाणा साधला होता.देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, “बंगळुरूमधील शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचे नाव सेंट मेरी असे ठेवण्याच्या कर्नाटक सरकारच्या निर्णयाचा निषेध आहे. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आहे. काँग्रेसने छत्रपती शिवरायांचा अपमान करण्याची परंपरा नेहरूंच्या काळापासून सुरू ठेवली आहे.

हे ही वाचा : 

कंगनंग जलाशय : ५२ दिवसांनी पहिल्यांदा वाढला पाणी साठा

“राज्याच्या पाणवठ्यांचा इतिहास वाचवण्यासाठी एकत्र पाऊल!”

डोक्यावर एक कोटींचे बक्षीस असलेल्या नक्षलवादी सुजाताचे आत्मसमर्पण

मणिपूरमधील सर्व संघटनांनी शांततेच्या मार्गाने स्वप्ने पूर्ण करावीत

डिसकव्हरी ऑफ इंडिया हे पुस्तक पंडित जवाहरलाल नेहरुंनी लिहिलं होतं, त्यामध्ये त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलचे जे मत व्यक्त केलं होत, हे आपल्याला माहिती आहे. काँग्रेसच्या सरकारमध्ये सातत्याने तीच परंपर दिसत आहे. ईश्वराने काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांना सुबुद्धी द्यावी. धार्मिक विरोधी व्यवस्था उभी करत ते तेढ निर्माण करणार नाहीत ही अपेक्षा आहे,” असे देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. 

Exit mobile version