पंजाबमधील बठिंडा-चंदीगड राष्ट्रीय महामार्गावरील एका कारमधून एका महिलेचा मृतदेह सापडला आहे. मृत महिलेची ओळख कंचन कुमारी ऊर्फ ‘कमल कौर भाभी’ अशी झाली असून त्या एक सोशल मीडिया इन्फ्लुएंसर होत्या. खरं तर, बठिंडा-चंदीगड राष्ट्रीय महामार्गावरील एका खासगी मेडिकल युनिव्हर्सिटीच्या पार्किंगमध्ये बनावट नंबर प्लेट लावलेली कार बराच वेळ उभी होती. त्या कारमधून दुर्गंधी येत असल्याचे लक्षात आल्यानंतर स्थानिक नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली. पोलीस घटनास्थळी पोहोचले असता कारमधून एका महिलेचा मृतदेह सापडला.
एका समाजसेवी संस्थेच्या कार्यकर्त्यांनी सांगितले की, त्यांना माहिती मिळाली होती की आदेश मेडिकल युनिव्हर्सिटीच्या पार्किंगमध्ये उभी असलेल्या कारमध्ये एखाद्या महिलेचा मृतदेह आहे आणि त्या ठिकाणाहून तीव्र दुर्गंधी येत आहे. त्यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता कारचे काचे बंद होते आणि मागील सीटवर एका महिलेचा मृतदेह होता. त्यांनी त्वरित पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला असून, प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
हेही वाचा..
“वेबस्टरनं विणलं ऑस्ट्रेलियाचं बॅटिंग वेब!”
उत्तर प्रदेशमध्ये लव्ह जिहाद, इस्लाम स्वीकारण्यास-हातावरील ओम चिन्ह काढण्यास दबाव!
नाना पटोलेंनी लष्कराची माफी मागावी
कोणत्या आयुर्वेदिक जडीबुटी इम्युनिटी वाढवतात ?
कँट पोलिस ठाण्याचे एसएचओ दलजीत सिंग यांनी सांगितले की, कंट्रोल रूमला माहिती मिळाली होती की एक संशयास्पद कार पार्किंगमध्ये उभी आहे व त्यामध्ये मृतदेह असण्याची शक्यता आहे. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन कारमधून महिलेचा मृतदेह बाहेर काढला. त्यांनी सांगितले की, त्या कारची अजून ओळख पटलेली नाही. मृतदेह सुमारे तीन ते चार दिवस जुना असावा असा अंदाज आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. कारमधील वस्तूंची तपासणी सुरू असून या घटनेच्या खऱ्या कारणांचा शोध घेतला जात आहे. मृत कंचन कुमारी यांच्या इन्स्टाग्रामवर ३ लाख ८४ हजार फॉलोअर्स होते आणि त्या विविध प्रकारचे कंटेंट बनवत असत.
