सर्जरीच्या वेळी सोनू निगमने गायले रफींचे गाणे, व्हिडिओ व्हायरल

चाहत्यांकडून लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव

सर्जरीच्या वेळी सोनू निगमने गायले रफींचे गाणे, व्हिडिओ व्हायरल

प्रसिद्ध गायक सोनू निगम यांच्या सर्जरीदरम्यानचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. रुग्णालयात उपचार सुरू असतानाही सोनू निगम यांनी आपलं संगीतावरील प्रेम कायम ठेवलं. सर्जरीपूर्वी उपचारादरम्यान रुग्णालयातील बेडवर असलेल्या सोनू निगम यांनी थेट गाणं सुरू केलं आणि उपस्थित डॉक्टरांसह वैद्यकीय पथकाचंही लक्ष वेधून घेतलं.

या व्हिडीओमध्ये सोनू निगम हा महान गायक मोहम्मद रफी यांचं प्रसिद्ध ‘सुहानी रात ढल चुकी’ हे गाणं गाताना दिसत आहेत. प्रकृतीची चिंता आणि सर्जरीचा ताण असतानाही सोनू निगम यांचा आवाज आणि गाण्याची तल्लीनता पाहून चाहत्यांनाही आश्चर्य वाटत आहे. विशेष म्हणजे त्यांनी हे गाणं आपल्या डॉक्टर आणि संपूर्ण वैद्यकीय टीमला समर्पित केलं.
हे ही वाचा:
अरुण पन्नालाल नावाच्या ख्रिश्चन व्यक्तीने केली शिवलिंगाची बदनामी

भारतात मेटाची मनमानी चालणार नाही

कॅनडात भारतीय वंशाच्या हिमांशीची हत्या केली होती अब्दुल गफूरीने

भारत-पाक सीमेवर बीएसएफची मोठी कारवाई; संशयित घुसखोर ठार

सोनू निगम यांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत उपचाराच्या काळात त्यांच्यावर प्रेम आणि काळजी घेणाऱ्या डॉक्टरांचे आभार मानले. त्यांच्या या अंदाजामुळे हा व्हिडीओ चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. अनेक चाहत्यांनी कमेंट्सच्या माध्यमातून सोनू निगम यांच्या धैर्याचं कौतुक करत त्यांना लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

काही काळापासून सोनू निगम यांना मानेजवळील नस दाबली गेल्यामुळे त्रास होत होता. या समस्येमुळे त्यांना वेदना आणि हालचाली करताना अडचणी जाणवत होत्या. त्यांच्यावर विविध तपासण्या आणि उपचार सुरू होते. आता त्यांच्यावर सर्जरी करण्यात आली असून त्यांची प्रकृती सुधारत असल्याची माहिती समोर आली आहे.

 

Exit mobile version