दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्यांना हा झटका!

एससीओ परिषदेत पहलगाम हल्ल्याच्या निषेधाचे स्वागत, राज्यमंत्री संजय सेठ यांची प्रतिक्रिया

दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्यांना हा झटका!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शांघाय सहकार्य संघटना (एससीओ) परिषदेत दहशतवादाच्या मुद्द्यावर घेतलेल्या ठाम भूमिकेचे संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ यांनी स्वागत केले आहे. त्यांनी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध केल्याबद्दल परिषदेत दिलेल्या एकजूट प्रतिक्रियेचे कौतुक केले.

“पहलगाम येथे झालेल्या हल्ल्याचा एससीओमध्ये तीव्र निषेध करण्यात आला, ही दहशतवाद व दहशतवाद्यांविरोधातील मोठी घडामोड आहे. पंतप्रधान मोदी हे नेहमीच दहशतवादाच्या विरोधात ठामपणे उभे राहिले आहेत. या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला, त्यांच्या मृत्यूसंदर्भात परिषदेत शोक व्यक्त करण्यात आला,” असे संजय सेठ यांनी म्हटले.

तसेच, या हल्ल्याच्या निषेधात अनेक आंतरराष्ट्रीय देश सहभागी झाले असून, यामुळे दहशतवाद्यांना आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्या देशांना एक कठोर आणि स्पष्ट संदेश मिळाला आहे, असेही ते म्हणाले. “हा दहशतवादाला पाठीशी घालणाऱ्या देशांसाठी मोठा धक्का आहे,” अशी टीका संजय सेठ यांनी केली. एससीओ परिषदेत भारताने पुन्हा एकदा दहशतवादाविरोधातील आघाडीवर आपली स्पष्ट आणि निर्णायक भूमिका मांडल्याचे या निमित्ताने स्पष्ट झाले आहे.

हे ही वाचा : 

शाहबाज शरीफ यांच्या उपस्थितीत पहलगाम हल्ल्याचा एससीओ देशांकडून तीव्र निषेध!

अफगाणिस्तान भूकंपाने हादरलं, २५० जणांचा मृत्यू, ५०० जखमी!

पंतप्रधान मोदी आणि पुतिन तिथून गेले, शाहबाज शरीफ पाहतच राहिले!

एससीओ शिखर परिषद: पंतप्रधान मोदींची पुतिन आणि जिनपिंग यांच्यासोबत महत्त्वाची बैठक!

दरम्यान, चीनमधील तियानजिन येथे झालेल्या शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) शिखर परिषदेत जारी करण्यात आलेल्या तियानजिन जाहीरनाम्यात जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध करण्यात आला आहे. जाहीरनाम्यात सदस्य देशांच्या नेत्यांनी पीडितांच्या आणि जखमींच्या कुटुंबियांना तीव्र शोक आणि सहानुभूती व्यक्त केली. आणि अशा हल्ल्यांचे दोषी, आयोजक आणि प्रायोजकांना न्याय मिळवून दिला पाहिजे असल्याचे, म्हटले आहे.

Exit mobile version