भारतीय पॅरा बॅडमिंटनपटू सुकांत कदम यांनी नुकत्याच पार पडलेल्या स्पॅनिश पॅरा बॅडमिंटन इंटरनॅशनल २०२५ स्पर्धेत प्रभावी कामगिरी केल्यानंतर बीडब्ल्यूएफ पॅरा बॅडमिंटन जागतिक क्रमवारीत एसएल ४ श्रेणीमध्ये दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. सुकांत सध्या ५३,६५० गुणांसह इंडोनेशियाच्या फ्रेडी सेतियावान यांच्यामागे आहेत, तर फ्रान्सच्या लुकास माजुर तिसऱ्या स्थानी आहेत.
या नवीन क्रमवारीतील झेप त्याच्या स्पेनमधील ग्रेड २ मधील दोन आणि ग्रेड १ मधील एकूण तीन स्पर्धांतील दमदार खेळामुळे शक्य झाली. ग्रेड २ स्पर्धेत, सुकांतने एसएल४ श्रेणीत सुवर्णपदक जिंकले, अंतिम फेरीत भारताच्या तरुणचा २१-१३, २१-१० असा पराभव केला.
हेही वाचा..
नागपूर हिंसाचारादरम्यान अंधाराचा फायदा घेत महिला पोलिस कर्मचाऱ्याचा विनयभंग
‘ग्राहक संरक्षण’ वाढवण्यासाठी केंद्र सरकारची मेटासोबत भागीदारी
रोहिंग्या-बांगलादेशी घुसखोरांना २५००० रुपयांना दिल्लीत पाठवत असत, १५ जणांना अटक!
विज्ञान, तंत्रज्ञानाने अंतराळातील अनेक अडचणींवर मात केली
या विजयाबद्दल सुकांत म्हणाला, “मी २०२५ ची सुरुवात सुवर्णपदकाने केल्याचा आनंद आहे. प्रत्येक सामना शिकण्यासारखा होता आणि मला सातत्याने चांगली कामगिरी करता आल्याचा आनंद आहे. ही जीत मला पुढील संपूर्ण हंगामासाठी प्रेरणा देईल.” ग्रेड १ स्पर्धेत सुकांतने उत्तम खेळ दाखवला, परंतु अंतिम फेरीत नवीन शिवकुंअरकडून १४-२१, २१-१४, १४-२१ अशा गुणसंख्येने पराभूत होऊन विजेतेपदाच्या थोडक्यात मागे राहिला.
सुकांतने आपल्या यशावर भाष्य करताना सांगितले, “ही २०२५ साठी अतिशय चांगली सुरुवात आहे आणि माझ्या कामगिरीबद्दल मी समाधानी आहे. जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर पोहोचणे हे अभिमानास्पद आहे, पण आता माझे लक्ष हे सातत्य राखण्यात आणि सुधारणा करण्यावर आहे. पुढील वर्षी आशियाई पॅरा गेम्स आणि जागतिक अजिंक्यपद स्पर्धा आहेत आणि त्यामध्ये सातत्यपूर्ण उत्कृष्ट कामगिरी करणे माझे ध्येय असेल. सुकांत कदम यांची ही झेप फक्त वैयक्तिक यश नव्हे, तर आंतरराष्ट्रीय स्तरावर पॅरा बॅडमिंटनमध्ये भारताच्या वाढत्या वर्चस्वाचे प्रतिक आहे. आगामी आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये संपूर्ण क्रीडाजगताची नजर त्यांच्यावर राहील.
