श्री मावळी मंडळ ठाणे संस्थेने २२ व्या श्री मावळी मंडळ आंतर शालेय अथेलेटिक्स स्पर्धां २०२५-२६ १३ व १४ डिसेंबर २०२५ रोजी संस्थेच्या क्रीडांगणात उत्साहाने आयॊजीत केली. सदर स्पर्धेमध्ये ठाण्यातील ४० शाळेच्या ८०० स्पर्धकांनी भाग घेतला हॊता.
ह्या स्पर्धेत ठाणे पोलीस स्कूलने मुलांच्या व मुलींच्या गटात सांघिक विजेतेपद मिळवीत सांघिक सर्वसाधारण विजेतेपद पटकाविले.
स्पर्धेचे उद्घाटन शनिवार १३ डिसेंबर रोजी प्रमुख पाहुणे सुहास देसाई (माजी नगरसेवक व सचिव राष्ट्रवादी काँग्रेस-अजित पवार गट) यांच्या हस्ते झाले. या स्पर्धेचा समारोप व पारितोषिक वितरण समारंभ १४ डिसेंबर रोजी प्रमुख पाहुणे राजेश पोवळे (संपादक दैनिक सामना कोकण विभाग ) यांच्या हस्ते झाला. त्यांच्याबरोबर संस्थेचे अध्यक्ष सुधाकर मोरे, उपाध्यक्ष मनीष मुंदडा, खजिनदार रिक्सन फर्नांडिस, चिटणीस रमण गोरे, उप चिटणीस संतोष सुर्वे, सहचिटणीस चिंतामणी पाटील, विश्वस्त कृष्णा डोंगरे, विश्वस्त प्रभाकर सुर्वे, विश्वस्त पॅट्रिक फर्नांडीस व विश्वस्त केशव मुकणे हे उपस्थित होते.
स्पर्धेचे निकाल पुढीलप्रमाणे :
मुले सर्वसाधारण विजेतेपद
ठाणे पोलीस स्कूल (९८ गुण – ११ सुवर्ण ११ रौप्य १० कांस्य)
मुली सर्वसाधारण विजेतेपद
ठाणे पोलीस स्कूल (८६ गुण – ०७ सुवर्ण १२ रौप्य १५ कांस्य)
सांघिक विजेता सर्वसाधारण विजेतेपद
ठाणे पोलीस स्कूल (२०८ गुण – २१ सुवर्ण २५ रौप्य २८ कांस्य)
सांघिक उपविजेता
वसंत विहार हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज (१२९ गुण – १५ सुवर्ण १३ रौप्य १५ कांस्य)
मुलांमध्ये सर्वोकृष्ट खेळाडू
विहान यादव (वसंत विहार हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज)
मुलींमध्ये सर्वोकृष्ट खेळाडू
आर्या पगारे (ठाणे पोलीस स्कूल)
वैयक्तिक चॅम्पियनशिप
मुले ६ वर्षाखालील
दक्ष छेडे (वसंत विहार हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज)
मुली ६ वर्षाखालील
आदित्य भगत (ठाणे पोलीस स्कूल)
मुले ८ वर्षाखालील
राजवीर गडले (ठाणे पोलीस स्कूल)
मुली ८ वर्षाखालील
दिविशा जैन (सि पी गोएंका आणि इंटरनॅशनल स्कूल )
मुले १० वर्षाखालील
जिहंश पाटील (अंबर इंटरनॅशनल)
मुली १० वर्षाखालील
काशवी करंजकर (श्रीमती सुलोचनादेवी सिंघानिया हायस्कूल)
मुले १२ वर्षाखालील
प्रियांश उतेकर (वसंत विहार हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज)
मुली १२ वर्षाखालील
युतिका पेनुली (होलीक्रॉस कॉन्व्हेंट हायस्कूल)
मुले १४ वर्षाखालील
युग पाटील (श्री मा विद्यालय, पाटलीपाडा)
मुली १४ वर्षाखालील
दीपिका सखदेव (सरस्वती स्कूल, नौपाडा) व नोचूरुवल्लपिल अँना अँथनी (होलीक्रॉस कॉन्व्हेंट हायस्कूल)
मुले १६ वर्षाखालील
आर्यन बच्छाव (ठाणे पोलीस स्कूल)
मुली १६ वर्षाखालील
क्रीशा शेट्टी (होलीक्रॉस कॉन्व्हेंट हायस्कूल)
विक्रम करणारी मुले.
मुले १० वर्षाखालील (लांब उडी)-
जिहांश पाटील (अंबर इंटरनॅशनल) – ४.१० मी.
मुली ६ वर्षाखालील (उभी उडी) –
विभावरी खामकर (वसंत विहार हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज) – १.५० मी.
मुली १० वर्षाखालील (लांब उडी) –
स्पृहा नाडकर्णी (सरस्वती स्कूल, नौपाडा) – ३.८८ मी.
मुली १४ वर्षाखालील (लांब उडी) –
दीपिका सखदेव (सरस्वती स्कूल, नौपाडा) – ४.८७ मी.
मुली १४ वर्षाखालील (भाला फेक) –
कामाक्षा दुधाडे (ठाणे पोलीस स्कूल) – २०.७० मी.
हेही वाचा :
पत्नीच्या मृत्यू प्रकरणात पंकजा मुंडेंचे स्वीय सहाय्यक तीन दिवस एसआयटी पोलिस कोठडीत
नोव्हेंबरमध्ये भारताची व्यापारतूट घटली
नमक्कलमध्ये अंड्यांचे दर विक्रमी पातळीवर
पाकिस्तानी पिता- पुत्राने केला सिडनीमधील हल्ला! पोलिसांनी काय दिली माहिती?
