माय होम इंडिया आणि भारतीय विचार साधना यांच्या संयुक्त विद्यमाने शशिकांत चौथाईवाले यांच्या संघ प्रचारकांच्या सुमधुर व प्रेरणादायी आठवणींच्या ‘माझी प्रचारक यात्रा’ ! (मूळ हिंदी) याच्या प्रकाशनाचे आयोजन करण्यात आले आहे.
या पुस्तकाचे इंग्रजी भाषांतर प्रभात प्रकाशन दिल्ली यांनी केले आहे. पुण्यामध्ये या इंग्रजी आवृत्तीचे प्रकाशन आणि मराठी अनुवादाचे पुनर्प्रकाशन केले जाणार आहे. प्रकाशक भारतीय विचार साधना, पुणे हे आहेत. शशिकांत चौथाईवाले उपाख्य शशीजी १९६१ मध्ये पूर्वांचलात, तेव्हाच्या आसाम प्रांतात, संघाचे प्रचारक म्हणून गेले होते. तेव्हापासून आजतागायत गेली ६१ वर्षे ते आसाम मध्येच कार्यरत आहेत.
हेही वाचा..
कुठे एका जवानाच्या बलिदानाची कथा?
राहुल गांधींना काँग्रेस मंत्र्याचा घरचा अहेर; आमच्याच काळात मतदार यादी तयार झाली!
अमेरिकेच्या पाठिंब्यावर पाकिस्तानला खुमखुमी!
बांगलादेशमध्ये आणखी एका पत्रकारावर हल्ला
१४ ऑगस्ट रोजी आदरणीय शशीजींच्या वयाला ८८ वर्षे पूर्ण होतील. त्यांच्या अभिष्टचिंतनाचा ही तो सोहळा असणार आहे. मंगळवार, १२ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजता लेडी रमाबाई हॉल, सर परशुरामभाऊ महाविद्यालय, सदाशिव पेठ, पुणे येथे हा कार्यक्रम होणार आहे. रा. स्व. संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य भैय्याजी जोशी आणि पश्चिम क्षेत्र प्रचारक सुमंत आमशेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न होणार आहे. या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन माय होम इंडिया आणि भारतीय विचार साधना यांच्या वतीने भाजपचे माजी राष्ट्रीय सचिव सुनील देवधर यांनी केले आहे.
