…आणि त्यांच्या शरीराला चिकटले चमचे, नाणी

…आणि त्यांच्या शरीराला चिकटले चमचे, नाणी

लस घेतल्यानंतर शरीराला स्टील, लोखंडाच्या वस्तू चिकटू लागल्याचा दावा करणारी अजब घटना नाशिकमध्ये घडली आहे. कोविशील्ड लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतर अरविंद सोनार या ७१ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला हा अनुभव आल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे सोशल मीडियामध्ये याची प्रचंड चर्चा सुरू आहे. पण यामागे कोणतेही वैज्ञानिक कारण नाही, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

जुन्या सिडको परिसरात राहणाऱ्या अरविंद सोनार यांनी कोविशील्ड लसीचा पहिला डोस ९ मार्चला घेतला होता. त्यानंतर २ जूनला कोविशील्ड लसीचा दुसरा डोस एका खासगी रुग्णालयात घेतला होता. लसीचा पहिला किंवा दुसरा डोस घेतल्यावर त्यांना कोणताही त्रास झाला नाही. त्यानंतर त्यांच्या शरीराला अशा विविध वस्तू चिकटत असल्याचे त्यांच्या मुलाला आढळले.

हे ही वाचा:

मालवणी इमारत दुर्घटना: केंद्र सरकारने जाहीर केली मदत

चीनच्या लशीला सौदी अरेबियातही किंमत नाही

‘कुत्रा इमानी असतो, तो भामट्यांवरच भुंकतो’

चिनी लि निंगला ठेंगा; ऑलिम्पिकपटूंच्या पोशाखावर फक्त ‘इंडिया’

लस घेतल्यानंतर एका व्यक्तीच्या शरीरावर लोखंडी वस्तू चिकटत असल्याचा एक प्रकार त्यांच्या मुलाने इंटरनेटवर पाहिला होता. त्याने आपल्या वडिलांवर तो प्रयोग केला. सुरुवातीला लोखंडाचा पत्रा लावून पाहिला, तो आकर्षित झाला. मग नाणी लावली, त्यानंतर स्टीलच्या वस्तू लावल्या आणि त्या चिकटल्या, असं अरविंद सोनार यांनी सांगितलं. परंतु खासगी डॉक्टरांशी संपर्क साधल्यावर त्यातून नेमकी माहिती मिळू शकली नाही.

सोनार यांच्यावर दहा वर्षांपूर्वी बायपास शस्त्रक्रिया झाली असून त्यांना मधुमेह आहे. या प्रकाराबद्दल सोनार यांनाही कुतुहल आहे. त्यांची तपासणी करण्यासाठी डॉक्टरांचे एक पथकही त्यांच्या घरी आले होते. त्यांच्या निगराणीत सोनार यांच्या शरीराला वस्तू चिकटत असल्याचेही डॉक्टरांनी पाहिले..

दरम्यान लसीचा आणि शरीराला स्टीलचा वस्तू चिकटण्याचा संबंध नाही, अशी प्रतिक्रिया राज्याच्या कोवड-१९ कृतीदलाचे सदस्य तात्याराव लहाने यांनी दिली आहे. या गोष्टीला कोणताही वैज्ञानिक आधार नाही, असे त्यांचे म्हणणे आहे.

Exit mobile version