32 C
Mumbai
Friday, March 29, 2024
घरराजकारण‘कुत्रा इमानी असतो, तो भामट्यांवरच भुंकतो’

‘कुत्रा इमानी असतो, तो भामट्यांवरच भुंकतो’

Google News Follow

Related

अतुल भातखळकर यांनी महापौर पेडणेकर यांना दिला जबरदस्त टोला

मालवणी येथे झालेल्या इमारत दुर्घटनेत ११ जणांचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर भाजपाने मुंबई महापालिकेच्या कारभारावर खरमरीत टीका केल्यानंतर त्यावर उत्तर देताना शिवसेनेच्या महापौर किशोरी पेडणेकर यांचा तोल ढासळला. त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना भाजपाबद्दल अपशब्द वापरले. त्याला मग भाजपा नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी सडेतोड उत्तर दिले.

महापौर पेडणेकरांना या दुर्घटनेसंदर्भात पत्रकारांनी प्रश्न विचारला. या दुर्घटनेला महापालिका प्रशासन जबाबदार असल्याचा भाजपाचा आरोप आहे, अशी विचारणा पत्रकारांनी केल्यावर महापौरांचा तोल गेला. त्या म्हणाल्या की, भाजप भौ भौ करत राहू दे, ते अगदी दूध के धुले आहेत… त्यावर आमदार अतुल भातखळकर यांनी तिखट भाषेत प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले की, महापौरांचे हे विधान त्यांचे संस्कार आणि पक्षाची संस्कृती दाखवणारे आहे. महत्त्वाचे म्हणजे कुत्रा इमानी असतो. तो चोर आणि भामट्यांवर भुंकतो हे लक्षात असू दे.

हे ही वाचा:
चिनी लि निंगला ठेंगा; ऑलिम्पिकपटूंच्या पोशाखावर फक्त ‘इंडिया’

बाळासाहेब ठाकरे की दि. बा. पाटील? नवी मुंबई विमानतळ नामांतर चिघळले

येत्या निवडणुकीत मुंबईकर शिवसेनेला जागा दाखवून देतील

इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत भारताला हरविण्याचा पाकचा ‘डाव’

मुंबईत बुधवारी झालेल्या मुसळधार पावसानंतर उडालेली त्रेधा आणि प्रशासनाचे सारे दावे फोल गेल्याचे स्पष्ट झाल्यानंतर ही दुर्घटना घडली. त्यात ११ जणांना आपले प्राण गमवावे लागले. त्यावरून भाजपाने पालिकेत सत्तास्थानी असलेल्या शिवसेनेला लक्ष्य केले आहे. महापौरांच्या या विधानाचा व्हीडिओ व्हायरल झाला असून त्यावरही नेटकऱ्यांनी सडकून टीका केली आहे.

‘तुझ्या बापाला’ची आठवण

महापौर पेडणेकर याआधीही असे अपशब्द वापरल्यामुळे टीकेचे लक्ष्य बनल्या होत्या. मुंबईकरांना लस उपलब्ध व्हावी म्हणून ग्लोबल टेंडर काढले आहे आणि एक कोटी लसींसाठी नऊ कंपन्या समोर आहेत, असे विधान करणाऱ्या महापौरांना ट्विटरवर एकाने काँट्रॅक्ट कुणाला दिले? असा सवाल विचारला होता. त्यावर महापौरांच्या ट्विटर हँडलवरून ‘तुझ्या बापाला’ असे उत्तर देण्यात आले होते. त्यावरून महापौरांवर सर्व स्तरातून प्रचंड टीका झाली. त्यांना माफीही मागावी लागली होती.  पुन्हा एकदा महापौर अडचणीत आल्या आहेत.

मुंबईतील नालेसफाई केल्याचे दावे करणाऱ्या पालिकेचे सगळेच बिंग पावसामुळे फुटले. एकाच दिवसातील या पावसामुळे सगळीकडे प्रचंड पाणी तुंबले आणि रहदारीचा बट्य़ाबोळ झाला. अनेक घरात पाणी शिरले. रेल्वे ट्रॅकवर पाणी शिरल्यामुळे रेल्वेही बंद कराव्या लागल्या. अनेक ठिकाणी अपघातही घडले. त्यात ही मालवणीतील ही दुर्घटना घडली आहे. एकाच दिवसातील पावसामुळे पालिकेच्या कोट्यवधीच्या कामाचे दावे पाण्यात वाहून गेले.

मुंबईत बुधवारी झालेल्या मुसळधार पावसानंतर उडालेली त्रेधा आणि प्रशासनाचे सारे दावे फोल गेल्याचे स्पष्ट झाल्यानंतर ही दुर्घटना घडली. त्यात ११ जणांना आपले प्राण गमवावे लागले. त्यावरून भाजपाने पालिकेत सत्तास्थानी असलेल्या शिवसेनेला लक्ष्य केले आहे. महापौरांच्या या विधानाचा व्हीडिओ व्हायरल झाला असून त्यावरही नेटकऱ्यांनी सडकून टीका केली आहे.

मुंबईतील नालेसफाई केल्याचे दावे करणाऱ्या पालिकेचे सगळेच बिंग पावसामुळे फुटले. एकाच दिवसातील या पावसामुळे सगळीकडे प्रचंड पाणी तुंबले आणि रहदारीचा बट्य़ाबोळ झाला. अनेक घरात पाणी शिरले. रेल्वे ट्रॅकवर पाणी शिरल्यामुळे रेल्वेही बंद कराव्या लागल्या. अनेक ठिकाणी अपघातही घडले. त्यात ही मालवणीतील ही दुर्घटना घडली आहे. एकाच दिवसातील पावसामुळे पालिकेच्या कोट्यवधीच्या कामाचे दावे पाण्यात वाहून गेले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
144,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा