31 C
Mumbai
Saturday, April 25, 2026
घरक्राईमनामालग्नात छेड काढणाऱ्या तरुणाचा पाठलाग करताना टाकीत पडून मृत्यू

लग्नात छेड काढणाऱ्या तरुणाचा पाठलाग करताना टाकीत पडून मृत्यू

९ जण जखमी

Google News Follow

Related

एका पेट्रोल पंपामागील मातेश्वरी हॉल परिसरात सुरू असलेल्या लग्न समारंभात छेडछाडीच्या वादातून निर्माण झालेल्या गोंधळात एक दुर्दैवी घटना घडली. छेड काढणाऱ्या अनोळखी तरुणाचा पाठलाग करताना काही जण बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी गेले असता उघड्या STP (सीवेज ट्रीटमेंट प्लांट) टाकीत पडल्याने एकाचा मृत्यू झाला, तर एकूण ९ जण जखमी झाले आहेत.

ही घटना २३ एप्रिल रोजी रात्री सुमारे ११.१५ वाजण्याच्या सुमारास घडली. मिळालेल्या माहितीनुसार, लग्न समारंभात एका मुलीची छेड काढल्याने वाद झाला. यानंतर संबंधित तरुणाला पकडण्यासाठी काही जण त्याच्या मागे धावले. तो ‘श्रद्धा कन्स्ट्रक्शन’ इमारतीच्या परिसरात शिरला. या ठिकाणी ग्राउंड फ्लोअरवर लाकडी फळ्या आणि पत्र्याने झाकलेली, बांधकामाधीन STP पाण्याची टाकी होती.

पाठलाग करताना एक जण त्या टाकीत पडला. त्याला वाचवण्यासाठी गेलेले इतरही काही जण टाकीत पडल्याने परिस्थिती अधिक गंभीर झाली. या दुर्घटनेत एकूण सहा लग्नातील पाहुणे आणि तीन बांधकाम कामगार जखमी झाले.
गंभीर जखमी असलेले भालचंद्र गणेश पल्ले (२५) यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. इतर जखमींमध्ये अनिकेत पाटील, श्रेयस सुर्वे, ऋषिकेश कदम, आदित्य आहेर, संकेत जुवाटकर यांच्यासह बांधकाम कामगार जयदत्त शहा, अंकित रॉय आणि हरिशंकर पासवान यांचा समावेश आहे. त्यांच्यावर सिटी केअर व मुलुंड जनरल रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

हे ही वाचा:

आम आदमी पक्षाचा भाजपावर ‘ऑपरेशन लोटस’चा गंभीर आरोप

हावडा ब्रिज…मोदींचे बोटिंग…फोटोग्राफी

मोदी आल्यापासून विरोधकांसाठी देश नरकच!

रशियाने २२ टन सोने विकले; जागतिक बाजारात खळबळ

घटनेची माहिती मिळताच पोलिस, अग्निशामक दल आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली. बचावकार्य तातडीने हाती घेण्यात आले. या प्रकरणी पुढील तपास सुरू असून, बांधकाम स्थळी सुरक्षेच्या उपाययोजनांबाबतही चौकशी होण्याची शक्यता आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
304,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा