34 C
Mumbai
Wednesday, November 4, 2026
घरविशेषविनय आपटे स्मृतिदिनानिमित्त शॉर्ट फिल्म स्पर्धेचे आयोजन

विनय आपटे स्मृतिदिनानिमित्त शॉर्ट फिल्म स्पर्धेचे आयोजन

३० नोव्हेंबरपर्यंत प्रवेशिका पाठवण्याची मुदत

Google News Follow

दिवंगत अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते विनय आपटे यांच्या १३व्या स्मृतिदिनानिमित्त विनय आपटे प्रतिष्ठान आणि विलेपार्ले येथील साठये महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने शॉर्ट फिल्म स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी प्रवेशिका पाठवण्याची अंतिम मुदत ३० नोव्हेंबर २०२६ आहे. यंदा स्पर्धेसाठी विषयाचे कोणतेही बंधन ठेवण्यात आलेले नाही. त्यामुळे स्पर्धकांना त्यांच्या आवडीच्या कोणत्याही विषयावर आधारित लघुपट सादर करता येणार आहे.

स्पर्धेत सहभागी होण्यासाठी लघुपटाची कमाल लांबी ३५ मिनिटे असणे आवश्यक आहे. मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेतील लघुपट स्वीकारले जाणार आहेत. अन्य भाषांतील लघुपटांसाठी सबटायटल्स असणे बंधनकारक आहे. प्रत्येक स्पर्धकाला केवळ एकच प्रवेशिका पाठवता येईल. प्रवेशासाठी एक हजार रुपये शुल्क निश्चित करण्यात आले आहे. स्पर्धकांनी गुगल फॉर्मद्वारे लघुपट सादर करून प्रवेश शुल्क भरायचे आहे.

हे ही वाचा:

मानहानीच्या दाव्यात लेखी उत्तरासाठी ठाकरे पिता-पुत्रांना मुदतवाढ नाही

बनावट व्हिडिओ शेअर केल्याप्रकरणी प्रशांत भूषण यांच्याविरोधात गुन्हा

‘चलो दिल्ली’ रॅलीला दांडी मारणारे काँग्रेसचे ८३ पदाधिकारी निलंबित

“मी निवडणूक लढवली असती, तर रिपब्लिकन पक्ष जिंकला असता”

स्पर्धेतील प्रथम क्रमांकाच्या विजेत्या लघुपटाला १५ हजार रुपये, द्वितीय क्रमांकाला १० हजार रुपये, तर तृतीय क्रमांकाला ७ हजार ५०० रुपयांचे रोख पारितोषिक दिले जाणार आहे. याशिवाय सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन, सर्वोत्कृष्ट संकलन आणि सर्वोत्कृष्ट छायाचित्रण या विभागांतही पारितोषिके देण्यात येणार आहेत. या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून ज्येष्ठ दिग्दर्शक पुरुषोत्तम बेर्डे, दिग्दर्शिका प्रतिमा कुलकर्णी, दिग्दर्शक राजन वाघधरे, जाहिरात तज्ज्ञ भरत दाभोळकर, ज्येष्ठ चित्रपट संकलक भक्ती मायाळू आणि लेखिका व गीतकार रोहिणी निनावे यांची निवड करण्यात आली आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
341,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा