29 C
Mumbai
Thursday, June 17, 2021
घर क्राईमनामा भाजपा नेत्याच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार

भाजपा नेत्याच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार

Related

काही घटना संतापजनक ह्या शब्दांच्या पलिकडच्या आहेत. कायदे कितीही कठोर केले, कितीही शिक्षा सुनावली तरी अल्पवयीन मुली, महिलांवरचे अत्याचार कमी होताना दिसत नाहीत. उलट अत्याचाराची परिसीमा गाठली जात असल्याचं दिसतं आहे. झारखंडची राजधानी रांचीमध्ये जे घडलं आहे ते ऐकून, वाचून तळपायाची आग मस्तकाला जाईल.

झारखंडमध्ये एक जिल्हा आहे. त्याचं नाव पलामू. इथेच भाजपाच्या एका स्थानिक नेत्याच्या अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्कार करुन, तिचे डोळे काढले, नंतर तिनं आत्महत्या केल्याचं भासवण्यासाठी तिचा मृतदेह चक्क झाडाला टांगला. पोलीसांनी प्रदीपकुमारसिंह नावाच्या एका आरोपीला अटक केली आहे. इतर आरोपींचा अजूनही शोध सुरु आहे. मुलीचं वय १६ वर्ष होतं.

ही घटना आहे ७ जूनची. म्हणजेच तीन दिवसांपुर्वीची. पीडीत मुलगी सकाळी १० वाजता घराबाहेर पडली ती परत आलीच नाही. मुलगी परतली नाही म्हणून आई वडीलांनी तिची शोधा शोध केली पण काहीच पत्ता लागला नाही. काही माहितीही मिळत नव्हती. शेवटी भाजपाचे स्थानिक नेता असलेल्या वडीलांनी पोलीसात तक्रार दाखल केली. पोलीसांनी मुलीचा शोध सुरु केला.

मुलगी बेपत्ता झाल्याच्या दोन दिवसानंतर म्हणजे ९ जून रोजी लालीमाटीच्या जंगलात एका मुलीचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत सापडला. कुटुंबियांनी ओळख पटवल्यानंतर ही त्यांचीच मुलगी असल्याची खात्री पटली.

हे ही वाचा:

येत्या निवडणुकीत मुंबईकर शिवसेनेला जागा दाखवून देतील

११,६१७ कोरोना रुग्णांच्या मृत्यूंची नोंदच नाही

मालवणीतील दुर्घटनेमुळे अनधिकृत बांधकामांचा मुद्दा ऎरणीवर

कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा लाखापेक्षा कमी

घटनास्थळावरुन एक मोबाईल पोलीसांच्या हाती लागला, त्यावरुन एकाला अटक करण्यात आली आहे. पीडीत मुलीचे डोळे काढले गेल्याचं तिच्या वडीलांनीच सांगितलं आहे. त्यांना चार मुली आणि एक मुलगा आहे. जिच्यावर बलात्कार झाला ती सर्वात मोठी मुलगी होती.

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,721चाहतेआवड दर्शवा
526अनुयायीअनुकरण करा
1,090सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा