यंदाचा पु.ल. कला महोत्सव शनिवारपासून

यंदाचा पु.ल. कला महोत्सव शनिवारपासून

सांस्कृतिक कार्य विभाग आणि पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई तर्फे उदयोन्मुख कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी तसेच त्या क्षेत्रातील जाणत्या कलावंतांच्या कलाविष्कारासाठी व्यासपीठ उपलब्ध करुन देण्यात येते. त्यानुसार विविध कलाविष्कारांवर आधारित “पु.ल. महोत्सवा” चे आयोजन दरवर्षी करण्यात येते. यावर्षी देखील पु.ल. कला महोत्सवाचे आयोजन शनिवार दिनांक ८ नोव्हेंबर ते बुधवार दिनांक १२ नोव्हेंबर या पाच दिवसांच्या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे.

हेही वाचा..

6G तंत्रज्ञानात भारताचे नेतृत्व होणार मजबूत

हायड्रोजन बॉम्ब कसला राहुल गांधींचा लवंगी तोटा

बांगलादेशातील चटगावमध्ये पुन्हा हिंसाचार

पार्थ पवारांचे जमीन खरेदी प्रकरण : काय म्हणाले मुख्यमंत्री ?

या महोत्सवांतर्गत विविध कलाविष्कार गायन, वादन, नृत्यकला, प्रदर्शने, लोककला सादरीकरण, नाट्यप्रयोग, इत्यादी विविध प्रकार सादर करण्यात येणार आहेत. सोबत सादर करण्यात येणाऱ्या कार्यक्रमांची कार्यक्रम पत्रिका जोडण्यात आली आहे. सदर कार्यक्रमासाठी रसिक प्रेक्षकांना प्रवेश विनामूल्य असून या कार्यक्रमाचा आस्वाद घेण्याची विनंती याद्वारे रसिक प्रेक्षकांस करण्यात येत आहे.

Exit mobile version