भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात १९९२ पासून आतापर्यंत एकूण ४४ कसोटी सामने खेळले गेले आहेत. चला, जाणून घेऊया त्या ५ फलंदाजांबद्दल, ज्यांनी या काळात सर्वाधिक धावा केल्या आहेत.
१. सचिन तेंडुलकर :
या यादीत सर्वात वर आहे भारताचा दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकर.
१९९२ ते २०११ या काळात मास्टर ब्लास्टरने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध २५ कसोटी सामने खेळले.
त्यात त्याने ४२.४६ च्या सरासरीने १,७४१ धावा केल्या.
या दरम्यान सचिनच्या बॅटमधून ७ शतके आणि ५ अर्धशतके झळकली.
२. जॅक कॅलिस :
दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज सर्वांगीण खेळाडू जॅक कॅलिस या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे.
त्याने २००० ते २०१३ दरम्यान भारताविरुद्ध १८ कसोट्यांतील ३१ डावांत
६९.३६ च्या शानदार सरासरीने १,७३४ धावा केल्या.
कॅलिसने या काळात ७ शतके आणि ५ अर्धशतके ठोकली.
डिसेंबर २०१० मध्ये सेंचुरियन येथे त्याने भारताविरुद्ध २०१ नाबाद धावा केल्या होत्या.
३. हाशिम आमला :
दक्षिण आफ्रिकेचा शांत आणि स्थिर फलंदाज हाशिम आमला तिसऱ्या स्थानावर आहे.
त्याने २००४ ते २०१८ दरम्यान भारताविरुद्ध २१ कसोट्यांमध्ये
४३.६५ च्या सरासरीने १,५२८ धावा केल्या.
या दरम्यान त्याने ५ शतके आणि ७ अर्धशतके झळकावली.
फेब्रुवारी २०१० मध्ये नागपूर येथे, आमलाने भारताविरुद्ध २५३ नाबाद धावा केल्या होत्या.
४. विराट कोहली :
भारताचा रन मशीन विराट कोहली चौथ्या क्रमांकावर आहे.
त्याने २०१३ ते २०२४ दरम्यान दक्षिण आफ्रिकेविरुद्ध १६ कसोट्या खेळल्या.
या दरम्यान त्याने ५४.१५ च्या सरासरीने १,४०८ धावा केल्या.
कोहलीच्या बॅटमधून ३ शतके आणि ५ अर्धशतके निघाली.
ऑक्टोबर २०१९ मध्ये पुण्यात, कोहलीने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध २५४ नाबाद धावा ठोकल्या होत्या.
५. ए.बी. डीव्हिलियर्स :
दक्षिण आफ्रिकेचा स्टार फलंदाज ए.बी. डीव्हिलियर्स पाचव्या स्थानावर आहे.
त्याने २००६ ते २०१८ दरम्यान भारताविरुद्ध २० कसोट्या खेळल्या.
या काळात त्याने ३९.२३ च्या सरासरीने १,३३४ धावा केल्या.
त्याच्या खात्यात ३ शतके आणि ६ अर्धशतके आहेत.
एप्रिल २००८ मध्ये अहमदाबाद कसोटीत डीव्हिलियर्सने २१७ नाबाद धावा ठोकल्या होत्या.
