वरण भात लोन्चा, व्हीडिओ नाय आता कोन्चा…

वरण भात लोन्चा, व्हीडिओ नाय आता कोन्चा…

मांजरेकरांच्या चित्रपटाचा ट्रेलर हटवला

महेश मांजरेकर यांच्या नाय वरण भात लोन्चा, कुणी नाय कोन्चा या चित्रपटाचा वादग्रस्त ट्रेलर आता यू ट्युबवरून हटविण्यात आला आहे. गिरणगावातील जीवनावर आधारित हा मांजरेकर यांचा आणखी एक चित्रपट आहे. याआधी लालबाग-परळ हा चित्रपटही याच विषयावर आधारित होता. मात्र या नव्या चित्रपटातील ट्रेलरवरून बराच वादंग माजला आहे. या चित्रपटात अश्लिल दृश्ये, शब्दप्रयोग आहेत ज्यामुळे या चित्रपटावर आक्षेप घेतला जात आहे.

राष्ट्रीय महिला आयोगानेही या चित्रपटातील काही दृश्यांवर आक्षेप घेतले आहेत. तसेच ही दृश्ये काढून टाकण्यास सांगितले आहे. महाराष्ट्रातील महिला आयोगानेही या चित्रपटातील दृश्यांवर आक्षेप घेतलेले आहेत आणि तशी नोटीस मांजरेकर यांना पाठविण्यात आली आहे. प्रदर्शित झालेल्या ट्रेलरमध्ये अल्पवयीन मुलगा आणि महिला आक्षेपार्ह स्थितीत असल्याचे दिसते. त्यावरून या ट्रेलरवर प्रचंड टीका झाली. त्यामुळे आता हा ट्रेलर यू ट्युबवर दिसत नाही. पत्रकार जयंत पवार यांच्या वरन भात लोन्चा, कोन नाय कोन्चा या कथेवर आधारित हा चित्रपट आहे.

हे ही वाचा:

कोरोना संसर्ग झालेल्या दोन कोटी लोकांना पेटीत केले बंद

१८ जानेवारीला पृथ्वीजवळून जाणार भलामोठा लघुग्रह!

साथीच्या रोगासाठी ठेवलेला पालिकेचा निधी आधीच संपला!

वर्ध्यात गोबर गॅस टाकीत सापडल्या कवड्या, हाडे; अवैध गर्भपाताचे रॅकेट?

 

याआधीही लालबाग परळ या चित्रपटातून गिरण गावातील जीवन, संप आणि त्यानंतर झालेली कामगारांची व त्यांच्या कुटुंबियांची अवस्था यांचे परिणामकारक चित्रण महेश मांजरेकर यांनी केलेले आहे. त्यामुळे या चित्रपटात नेमके काय वेगळे पाहायला मिळते याविषयी चर्चा होती. १४ जानेवारीला हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.

Exit mobile version