मध्यप्रदेशातील जबलपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसमोर सध्या सर्वात मोठी अडचण म्हणजे युरिया आणि डीएपी खताची टंचाई. शहपुरा, चरगवां, बेलखेड़ा, नीमखेड़ा यांसारख्या अनेक भागांतील शेतकरी अनेक दिवसांपासून खतासाठी भटकत आहेत. हरभऱ्याच्या पेरणीचा हंगाम सुरू असूनही खत उपलब्ध नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त आणि संतापलेले आहेत. खत वितरणासाठी जबलपूरपासून सुमारे ४० किलोमीटर अंतरावर असलेल्या शहपुरा कृषी उत्पन्न मंडई परिसरात व डबल लॉक सेंटरवर सकाळपासूनच शेतकऱ्यांच्या लांबलचक रांगा लागत आहेत. भुकेले- तहानलेले शेतकरी तासन्तास थांबतात, पण वेळेवर खत मिळत नाही. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रशासनाला पोलीस बंदोबस्तही तैनात करावा लागला आहे.
शेतकरी जितेंद्र सिंह यांनी बोलताना सांगितले, “आम्ही रात्री ३ वाजल्यापासून रांगेत उभे आहोत. मला १८० नंबरचा टोकन मिळाला आहे; सकाळपासून काहीही न खाता-पिता थांबून आहोत, पण अजून खत मिळालेले नाही.” तर दुसरे एक शेतकरी म्हणाले, “डीएपी खत घेण्यासाठी सकाळी 5 वाजल्यापासून उभे आहोत, पण अजूनपर्यंत खत मिळाले नाही. गोदामात युरियाचा साठा आहे, तरीसुद्धा वितरण होत नाही.” आणखी एका शेतकऱ्याने सांगितले, “२२ ऑगस्टला माझा टोकन कापला होता, पण एका महिन्यापासून खतासाठी त्रास सहन करतो आहे. वारंवार रांगेत उभे राहूनही खत मिळत नाही.”
हेही वाचा..
पंतप्रधान मोदींना मिळाले अनोखे पेंटिंग
इतिहाससाधनेला जीवन अर्पण करणारा ऋषितुल्य संशोधक
इतर देशांवर असलेले अवलंबित्व हाच आपला शत्रू!
“आय लव्ह मोहम्मद”ची रील बनवणाऱ्याला चौकशीसाठी बोलावताच पोलिसांवर दगडफेक
या संदर्भात कृषी अधिकारी एस.के. परतेती यांनी माहिती दिली की, शेतकऱ्यांना टोकनच्या आधारे खत उपलब्ध करून दिले जात आहे. ज्यांचा क्रमांक आधीपासून नोंद आहे, त्यांना प्राधान्य दिले जात आहे. त्यांनी सांगितले की, युरियाची नवी खेप सोमवार-मंगळवारपर्यंत येण्याची शक्यता आहे आणि खत उपलब्ध होताच शेतकऱ्यांना वितरित केले जाईल. शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, त्यांनी यापूर्वीही अनेकदा खतपुरवठ्याची मागणी केली, पण समस्या सुटलेली नाही. प्रशासन रोज पुरेशा साठ्याचा दावा करते, मात्र प्रत्यक्षात शेतकरी तासन्तास रांगेत उभे राहूनही रिकाम्या हाताने परतण्यास भाग पाडले जात आहेत.
