उत्तराखंडच्या ‘खुनी’ या गावाचे नाव बदलून ठेवले ‘देविग्राम’, कारण काय? 

सरकारकडून अधिकृत आदेश जारी 

उत्तराखंडच्या ‘खुनी’ या गावाचे नाव बदलून ठेवले ‘देविग्राम’, कारण काय? 

उत्तराखंडच्या पिथौरागढ जिल्ह्यातील ‘खूनी’ या गावाचे नाव आता ‘देविग्राम’ असे ठेवण्यात येणार आहे. या संदर्भात उत्तराखंड सरकारने अधिकृत आदेश जारी केला आहे. गावाचे जुने नाव ‘खूनी’ (ज्याचा अर्थ “हत्या संबंधित” असा होतो) नकारात्मक भावनांना प्रवृत्त करतो, त्यामुळे स्थानिक नागरिकांनी नाव बदलण्याची मागणी केली होती. सरकारने ती मागणी मान्य करत नवीन नाव ‘देविग्राम’ जाहीर केले आहे, ज्यामुळे गावाच्या ओळखीला सकारात्मक आणि धार्मिक छटा मिळणार आहे.

“खूनी” या नावात हत्या, नकारात्मक आणि भयभावना यांचा अर्थ उपस्थित असल्याचे गावकर्‍यांचे मत होते. यामुळे गावकर्‍यांनी अनेक वर्षे नाव बदलण्याची इच्छा व्यक्त केली होती. राज्यमंत्री अजय टम्टा यांनी देखील यामध्ये पुढाकार घेवून नाव बदलण्याची मागणी केली होती. अखेर त्यांच्या प्रयत्नांमुळे शेवटी राज्य सरकारने नाव बदलण्याची मंजुरी दिली आहे. याबाबत त्यांनी एक्सवर पोस्ट केली आहे.

राज्यमंत्री अजय टम्टा सोशल मीडियावर पोस्टकरत लिहिले, “जनतेच्या भावना आणि दीर्घकाळापासून चालत आलेल्या मागणीचा विचार करून, ‘खूनी’ या गावाचे नाव बदलून ‘देविग्राम’ असे ठेवण्याची अधिसूचना राज्य सरकारने जारी केली आहे.”

Exit mobile version