टी-२० मध्ये वरुणराज!

टी-२० मध्ये वरुणराज!

भारतीय संघाचा रहस्यमय फिरकीपटू वरुण चक्रवर्ती याने आयसीसीने जाहीर केलेल्या ताज्या टी-२० रँकिंगमध्ये मोठी कामगिरी केली आहे. रेटिंगच्या बाबतीत त्याने भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह यालाही मागे टाकत टी-२० प्रकारात सर्वोत्तम रेटिंग मिळवणारा भारतीय गोलंदाज होण्याचा मान मिळवला आहे.

जसप्रीत बुमराहने १ फेब्रुवारी २०१७ रोजी आपल्या टी-२० कारकिर्दीतील सर्वोच्च ७८३ रेटिंग मिळवली होती. मात्र, वरुण चक्रवर्तीने आता ही रेटिंग ओलांडत ८१८ रेटिंग मिळवली असून तो थेट टी-२० गोलंदाज रँकिंगमध्ये अव्वल स्थानावर पोहोचला आहे.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेत वरुणने अप्रतिम गोलंदाजी केली. तीन सामन्यांत त्याने ६ बळी घेतले आणि याच कामगिरीचा त्याच्या रेटिंगला मोठा फायदा झाला.

आयसीसी टी-२० गोलंदाज रँकिंग (टॉप १०):

  1. वरुण चक्रवर्ती (भारत)

  2. जेकब डफी (न्यूझीलंड)

  3. राशिद खान (अफगाणिस्तान)

  4. अबरार अहमद (पाकिस्तान)

  5. वानिंदु हसरंगा (श्रीलंका)

  6. आदिल रशीद (इंग्लंड)

  7. अकील हुसैन (वेस्ट इंडिज)

  8. मुस्तफिजूर रहमान (बांगलादेश)

  9. नाथन एलिस (ऑस्ट्रेलिया)

  10. अ‍ॅडम झाम्पा (ऑस्ट्रेलिया)

भारतीय संघातील अक्षर पटेल १३व्या, तर अर्शदीप सिंगने चार स्थानांची झेप घेत १६व्या क्रमांकावर मजल मारली आहे.

टी-२० फलंदाज रँकिंग (टॉप १०):

टी-२० फलंदाजांमध्ये भारताचा अभिषेक शर्मा अव्वल स्थानी आहे. इंग्लंडचा फिल सॉल्ट दुसऱ्या, श्रीलंकेचा पाथुम निसांका तिसऱ्या, तर भारताचा तिलक वर्मा चौथ्या स्थानावर आहे. तिलकने दोन स्थानांची झेप घेतली आहे.

इंग्लंडचा जोस बटलर पाचव्या, पाकिस्तानचा साहिबजादा फरहान सहाव्या, ऑस्ट्रेलियाचा ट्रॅव्हिस हेड सातव्या, मिचेल मार्श आठव्या, न्यूझीलंडचा टिम सिफर्ट नवव्या, तर ऑस्ट्रेलियाचा टिम डेव्हिड दहाव्या स्थानावर आहे.
दरम्यान, भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव टॉप-१० मधून बाहेर गेला आहे.

Exit mobile version