११ जुलै पासून कावड यात्रा सुरु झाली आहे. याच पार्श्वभूमीवर विहिंपने शहरातील रस्त्यांवरील रेस्टॉरंट्स, भोजनालये आणि किराणा दुकानांच्या भिंतींवर स्टिकर्स चिकटवण्यास सुरुवात केली आहे. या मोहिमेअंतर्गत, शाकाहारी खाद्यपदार्थ विकणाऱ्या दुकानांना प्रमाणित केले जात आहे. याअंतर्गत हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि किराणा दुकानांना चिन्हांकित केले आहे.
यात्रेच्या तयारीवर देखरेख करणाऱ्या आमदारांच्या समितीचे प्रमुख असलेले पर्यटन मंत्री कपिल मिश्रा यांनी काही दिवसांपूर्वी असे म्हटले होते की अशा रस्त्यांवरील मांस दुकाने बंद राहतील. परंतु एमसीडीने असे आदेश जारी करण्याचा अधिकार नसल्याचे सांगितले. भगव्या स्टिकर्सच्या वर ‘गर्व से कहो हम हिंदू हैं’ आणि खाली ‘सनातनी व्यापारी संस्थान’ असे लिहिलेले आहे.
विहिंपचे राज्य सरचिटणीस सुरेंद्र गुप्ता म्हणाले की, शहरातील ३० जिल्ह्यांमधील दुकानांवर स्टिकर्स चिकटवण्यासाठी पथके तयार करण्यात आली आहेत. ते म्हणाले की, स्टिकर्स लावण्याची जबाबदारी दुकानदारांची आहे. अल्पसंख्याक समुदायाच्या सदस्यांनी चालवलेल्या दुकानांना वगळण्यात येत असल्याचे तेथील पथकांनी सांगितले.
गुप्ता म्हणाले की, शिवभक्त ही अतिशय “कठोर आणि पवित्र” तीर्थयात्रा करतात आणि ती “भ्रष्ट” होऊ नये म्हणून त्यांना योग्य सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. “भक्त त्यांच्या यात्रेदरम्यान त्यांचे पाण्याचे भांडे जमिनीवर ठेवत नाहीत. जर त्यांनी या दुकानातून काही खाण्यासाठी खरेदी केली तर ते सनातन धर्माच्या पारंपारिक मूल्यांनुसार आहे याची खात्री करावी,” असे ते म्हणाले. व्यवसाय मालकांना अन्नपदार्थांच्या शुद्धतेचे “स्वैच्छिक प्रमाणिकता” (स्वैच्छिक प्रमाणपत्र) देण्यास सांगितले जात आहे.
हे ही वाचा :
दिल्ली हादरली: इमारत कोसळल्याने अनेक जण ढिगाऱ्याखाली, मदतीचे प्रयत्न सुरू
छत्तीसगड: २२ नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण!
टेनिस खेळाडू राधिका यादवच्या अकादमीच्या वादातून वडिलांनी केला खून
बहुतेक भाविक रस्त्यांवर उभारलेल्या छावण्यांमध्ये जेवायला प्राधान्य देतात, तरीही बरेच जण अजूनही दुकाने आणि भोजनालयांमधून अन्नपदार्थ खरेदी करतात, असे गुप्ता म्हणाले. गुप्ता म्हणाले की, पथके दुकानांवर स्टिकर्स लावण्यापूर्वी “पारंपारिक सनातनी मूल्यांचे” पालन केले जात आहे याची खात्री करण्यासाठी तिथे विकल्या जाणाऱ्या अन्नपदार्थांची तपासणी करत आहेत.
दरम्यान, शुक्रवारी (११ जुलै) कावड यात्रा सुरू झाली, मोठ्या संख्येने भाविक गंगाजल घेण्यासाठी पवित्र हरिद्वार शहरात पोहोचले आहेत. गुप्ता म्हणाले की, कावड यात्रा संपल्यानंतरही ‘सनातनी’ दुकानांना प्रमाणित करणे सुरू राहील. “आम्ही अशा सर्व दुकानांची एक विस्तृत यादी तयार करू आणि त्यांना प्रमाणपत्रे देऊ,” असे ते म्हणाले.
