‘मतदार अधिकार यात्रा’: राहुल गांधींच्या ताफ्याने पोलिसाला चिरडले!

भाजपाकडून व्हिडीओ पोस्टकरत जोरदार टीका

‘मतदार अधिकार यात्रा’: राहुल गांधींच्या ताफ्याने पोलिसाला चिरडले!

बिहारच्या ‘मतदार अधिकार यात्रा’मध्ये रोड शो दरम्यान एका पोलिस कॉन्स्टेबलला “चिरडल्या”बद्दल काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर भाजपाकडून जोरदार टीका करण्यात आली. भाजप प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी एक्सवर याचा व्हिडीओ पोस्ट केला, ज्यामध्ये राहुल गांधींना घेऊन जाणारी एक गाडी एका पोलिस कॉन्स्टेबलच्या अंगावर गेल्याची दिसली. यानंतर पोलीस कर्मचाऱ्याला बाहेर काढल्यानंतर तो लंगडताना दिसला.

या घटनेवरून पूनावाला यांनी राहुल गांधींवर टीका केली. ही ‘मतदार अधिकार यात्रा’ नसून ती ‘क्रश जनता यात्रा’ असल्याचे पूनावाला यांनी म्हटले. ते पुढे म्हणाले, “राहुल गांधींच्या गाडीने एका पोलिस कॉन्स्टेबलला चिरडले, जे गंभीर जखमी झाले होते. घराणेशाहीतील नेता त्याला पाहण्यासाठी खाली सुद्धा उतरलाही नाही.”

दरम्यान, व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये पोलिस कॉन्स्टेबल लंगडताना दिसला. घटनेनंतर राहुल गांधी त्यांच्या दिशेने पाण्याची बॉटल फेकताना दिसले. त्याचवेळी लगेच इतरांनी पोलिस कॉन्स्टेबलला राहुल गांधी यांच्याकडे नेले, यावेळी राहुल गांधी त्यांची विचारपूस करताना दिसले. मात्र, राहुल गांधी त्यांच्याकडे स्वतःहून गेले नाहीत.

हे ही वाचा : 

मुंबईत चोवीस तासांत ढगफुटीसदृश्य पाऊस

मुख्तार अब्बास नकवी यांचा राहुल गांधींवर निशाणा

मतचोरीचा आरोप केला आणि नंतर मागितली माफी!

राज्यमहोत्सव म्हणून साजरा होणाऱ्या गणेशोत्सवाच्या बोधचिन्हाचे अनावरण

१७ ऑगस्ट पासून सासाराम येथून सुरू झालेली ‘मत अधिकार यात्रा’ ही १६ दिवसांची मार्च आहे, ज्याचा उद्देश एसआयआर आणि कथित ‘मत चोरी’चा निषेध करणे आहे. २० जिल्ह्यांमधून १,३०० किमी पेक्षा जास्त प्रवास केल्यानंतर ही रॅली १ सप्टेंबर रोजी पाटणा येथे संपणार आहे.

Exit mobile version