पंतप्रधान मोदी आणि मार्क कार्नी यांची काय चर्चा झाली ?

पंतप्रधान मोदी आणि मार्क कार्नी यांची काय चर्चा झाली ?

भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी सांगितले की, जी-७ शिखर परिषदेदरम्यान कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांच्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची झालेली भेट सकारात्मक आणि फलदायी झाली असून, दोन्ही देशांनी परस्पर संबंध पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी संतुलित पावले उचलण्यावर सहमती दर्शवली आहे. परराष्ट्र सचिव मिस्री यांच्या म्हणण्यानुसार, या बैठकीत “अत्यंत सकारात्मक आणि रचनात्मक” चर्चा झाली आणि दोन्ही नेत्यांनी संबंधांत स्थैर्य आणण्यासाठी “सुयोजित आणि काळजीपूर्वक” पावले उचलण्याचे ठरवले.

मिस्री म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांची कनानास्किस (कॅनडा) येथे जी-७ शिखर परिषदेदरम्यान एक सकारात्मक आणि रचनात्मक बैठक पार पडली. या बैठकीत अलीकडे तणाव निर्माण झालेल्या भारत-कॅनडा संबंधांमध्ये सुधारणा घडवून आणण्याची परस्पर इच्छाशक्ती व्यक्त करण्यात आली. मिस्री पुढे म्हणाले, “ही चर्चा भारत-कॅनडा संबंधांच्या महत्त्वावर केंद्रित होती, जे परस्पर मूल्ये, लोकशाही, कायद्याचे राज्य, लोक-ते-लोक संबंध आणि इतर अनेक साम्यांवर आधारित आहेत.

हेही वाचा..

पती कर्ज फेडण्यात अयशस्वी, सावकाराने पत्नीला झाडाला बांधत केली मारहाण!

आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवादी नेत्याच्या ३ नातेवाईकांची नक्षलवाद्यांकडून हत्या!

अमेरिकेला खामेनी कुठे लपलेत माहिती आहे, पण आत्ताच मारणार नाही!

एअर इंडियाच्या बोईंग 787 च्या तपासणीत कोणतीही सुरक्षा समस्या नाही

शुरुवातीच्या टप्प्यावर, दोन्ही नेत्यांनी लवकरात लवकर एकमेकांच्या राजधानीत उच्चायुक्तांची नेमणूक पुन्हा सुरू करण्यावर सहमती दर्शवली. मिस्री म्हणाले, “पंतप्रधान दोघेही या अत्यंत महत्त्वाच्या नातेसंबंधांमध्ये स्थैर्य पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी काळजीपूर्वक पावले उचलण्यावर सहमत झाले असून, त्यातील पहिलं पाऊल म्हणजे एकमेकांच्या राजधानीत उच्चायुक्तांची नेमणूक लवकरात लवकर पुन्हा करणे हे ठरले. भविष्यात इतर कूटनीतिक उपायही उचलले जातील. तसेच, विविध क्षेत्रांतील वरिष्ठ आणि कार्यकारी स्तरावरील संवाद प्रणाली पुन्हा सुरु करण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला. व्यापार, लोकसंपर्क, आणि संपर्क सुलभता अशा विविध क्षेत्रांमध्ये पुन्हा संवाद सुरू करण्यावरही सहमती झाली. याचबरोबर, अर्धवट थांबलेल्या व्यापार चर्चांबाबतही पुन्हा सुरुवात करण्याचे निर्देश देण्याचा निर्णय झाला.

मिस्री म्हणाले, “दोन्ही देशांमधील व्यापार चर्चा सध्या स्थगित अवस्थेत आहेत. हे लक्षात घेऊन दोन्ही नेत्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना त्या लवकरात लवकर पुन्हा सुरू करण्याचे निर्देश देण्याचे ठरवले आहे. तसेच, भविष्यात पुन्हा एकदा लवकरच भेट घेण्यावरही सहमती दर्शवण्यात आली. पंतप्रधान मोदी यांनी जी-७ परिषदेत आमंत्रण दिल्याबद्दल कार्नी यांचे आभार मानले आणि २०१५ मधील त्यांच्या कॅनडा दौर्‍याची आठवण काढली. त्यांनी म्हटले, “पुन्हा एकदा कॅनडामध्ये येणे हा माझ्यासाठी सन्मान आहे. भारताने जी-२० परिषदेदरम्यान घातलेली ठोस पायाभरणी जी-७ परिषदेत अधिक विस्तारली गेली असून, ती आता अंमलबजावणीच्या दिशेने जात आहे.

Exit mobile version