प्राथमिक अहवालात धक्कादायक खुलासा; टेक-ऑफनंतर एअर इंडियाची दोन्ही इंजिन बंद

१५ पानांचा अहवाल आला समोर

प्राथमिक अहवालात धक्कादायक खुलासा; टेक-ऑफनंतर एअर इंडियाची दोन्ही इंजिन बंद

एअर इंडियाच्या बोईंग 787-8 विमानाच्या १२ जून रोजी अहमदाबादजवळ झालेल्या दुर्घटनेवर एअरक्राफ्ट ऍक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोने (AAIB) १५ पानांचा प्राथमिक अहवाल प्रसिद्ध केला आहे.

अहवालानुसार, टेक-ऑफनंतर काही सेकंदातच विमानाची दोन्ही इंजिन अचानक बंद झाली होती. इंजिन १ आणि इंजिन २ चे इंधन कट-ऑफ स्विच ‘रन’ वरून ‘कट ऑफ’ स्थितीत एकाच सेकंदात गेले.

AAIB ने सांगितले की, अपघातग्रस्त विमानाच्या दोन्ही इंजिनने सुरुवातीला जोर कमी झाल्यानंतर क्षणभर सावरायचा प्रयत्न केला, मात्र शेवटी ते स्थिर राहू शकले नाहीत. या अपघातात २६० लोकांचा मृत्यू झाला.

विमानाचे अवशेष ड्रोन फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी करून सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहेत.

हे ही वाचा:

चक्रासन का आहे संपूर्ण शरीरासाठी फायदेशीर?

तरुणांसाठी सुवर्णसंधी! अकोल्यात १५ जुलैला ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’

“उत्क्रांती नव्हे, ही आरोग्य क्रांती आहे” – गौतम अदानी

१७ सप्टेंबर, मोदींचा वाढदिवस ‘सेवा दिवस’ की ‘सेवा निवृत्ती’ दिवस?

तांत्रिक तपशील:

पायलट एकमेकांशी काय बोलले?

कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डिंगमध्ये एका पायलटने दुसऱ्या पायलटला विचारले, “का कट-ऑफ केलं?” यावर दुसऱ्या पायलटने सांगितले की, त्याने असं काही केलं नाही.

या संभाषणामुळे तांत्रिक बिघाड किंवा पायलटमधील संवादातील गैरसमजाविषयी शंका निर्माण झाली आहे.

एअरपोर्टच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये टेक-ऑफनंतर लगेचच Ram Air Turbine (RAT) बाहेर येताना दिसली.

विमानाने हवेत पुरेशी झेप घेण्यापूर्वीच उंची गमवायला सुरुवात केली आणि विमानतळाच्या भिंतीच्या पलीकडे जाण्याआधीच कोसळले.

अहवालानुसार, फ्लाइट पथाजवळ कोणतीही मोठी पक्ष्यांची हालचाल नव्हती, त्यामुळे पक्षी धडकण्याची शक्यता सध्या नाकारण्यात आली आहे.

पुढील तपास:

ही दुर्घटना लंडनला जाणाऱ्या फ्लाइटची होती. टेक-ऑफनंतर काही सेकंदात अहमदाबादच्या BJ मेडिकल कॉलेज हॉस्टेल इमारतीवर कोसळल्याने २६० लोकांचा मृत्यू झाला होता, त्यात २४१ प्रवासी व क्रू सदस्य आणि जिथे विमान कोसळले तेथील १९ लोक होते.

Exit mobile version