का साजरा केला जातो जागतिक स्तनपान सप्ताह

का साजरा केला जातो जागतिक स्तनपान सप्ताह

दरवर्षी ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात (१ ते ७ ऑगस्ट) जागतिक स्तनपान सप्ताह साजरा केला जातो. यामागचा उद्देश म्हणजे अर्भकांना कुपोषणापासून वाचवणे आणि त्यांच्या मानसिक व शारीरिक विकासाला प्रोत्साहन देणे. जागतिक आरोग्य संघटना (WHO) आणि युनिसेफ यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबवला जातो, जो स्तनपानाच्या महत्त्वावर प्रकाश टाकतो – कारण ते बालकांच्या आरोग्यासाठी आणि त्यांच्या जीवनरक्षणासाठी सर्वात प्रभावी मार्ग आहे.

यावर्षीची थीम आहे, स्तनपानाला प्राधान्य द्या: शाश्वत सहाय्य प्रणाली निर्माण करा. या थीमचा उद्देश म्हणजे मातांच्या आणि नवजात बालकांच्या आरोग्याला प्रोत्साहन देणे. यामध्ये स्तनपानासाठी मातांना प्रोत्साहन देणे तसेच पर्यावरणाच्या रक्षणासाठी सहाय्य निर्माण करणे या दोन्ही बाबी अधोरेखित केल्या आहेत. WHO आणि युनिसेफच्या मते, स्तनपान हा बालकांना निरोगी ठेवण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. हे दूध बालकांना पोषण पुरवते आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवते, ज्यामुळे अतिसार, न्यूमोनिया यांसारख्या आजारांपासून संरक्षण होते. याशिवाय, स्तनपानामुळे मातांमध्ये स्तनाचा कर्करोग, अंडाशयाचा कर्करोग आणि टाईप-२ मधुमेह होण्याचा धोका कमी होतो.

हेही वाचा..

अमेरिका ३५० टक्क्यांपर्यंत टॅरिफ लावतो

बांगलादेशमध्ये बीएनपी आणि एनसीपी समर्थकांमध्ये राडा

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष सुटका!

अमेरिकन नौदलाचे F-३५ लढाऊ विमान कोसळले!

सध्या जागतिक स्तरावर ६ महिन्यांखालील केवळ ४८% बालकांनाच पूर्ण स्तनपान दिले जाते. गेल्या १२ वर्षांत हे प्रमाण १०% ने वाढले असून यामुळे लाखो बालकांचे प्राण वाचले आहेत. मात्र, २०२५ पर्यंत ५०% च्या उद्दिष्टावर पोहोचण्यासाठी अजून प्रयत्नांची गरज आहे. युनिसेफच्या आकडेवारीनुसार, जर स्तनपानाचे प्रमाण सुधारले, तर दरवर्षी सुमारे ८.२ लाख बालकांचे प्राण वाचवता येऊ शकतात. आपत्तीच्या काळात देखील हे बालकांसाठी एक सुरक्षित, पोषक आणि सहज उपलब्ध अन्नस्रोत ठरते. या मोहिमेचा हेतू म्हणजे समाज, कार्यस्थळे आणि सरकारी धोरणांमध्ये असे बदल घडवून आणणे जे स्तनपानासाठी पोषक वातावरण निर्माण करतील. बाटलीतील दूधामुळे होणारे तोटे यासंबंधी जागरूकता निर्माण करणे आणि कार्यस्थळी स्तनपानासंबंधी सोयीसुविधा उपलब्ध करून देणे हा देखील या अभियानाचा भाग आहे. यावर्षीची थीम पर्यावरण आणि मातृ आरोग्य यांना एकत्र आणते आणि स्तनपान ही शाश्वत व पर्यावरणास अनुकूल कृती आहे, हे अधोरेखित करते.

स्तनपानाचे फायदे: शिशूंना आजारांपासून संरक्षण देणाऱ्या अँटीबॉडीज मिळतात. माता आणि बाळ दोघांच्याही आरोग्यास फायदेशीर. आपत्कालीन परिस्थितीत सुरक्षित आणि पौष्टिक अन्नाचा स्रोत. मातांमध्ये काही प्रकारच्या कर्करोगांचा धोका कमी होतो. भारतामध्ये या आठवड्यात अंगणवाडी कार्यकर्त्या, आशा वर्कर्स आणि आरोग्य कर्मचारी स्तनपानाचे फायदे सांगण्यासाठी घरोघरी जाऊन जनजागृती करतात. हा आठवडा केवळ मातांसाठी किंवा बाळांसाठीच नव्हे, तर समाज आणि पर्यावरणासाठी देखील अतिशय महत्त्वाचा आहे.

Exit mobile version