कर्नाटकातील सिद्धरामय्या सरकारची इस्लामिक कट्टरपंथीयांबद्दलची भूमिका बऱ्याच काळापासून स्पष्ट आहे. आरक्षणापासून ते मुस्लिम वसाहती बांधण्यापर्यंत, ते तुष्टीकरणासाठी काहीही करण्यास तयार आहे. आता त्यांचे प्रेम ख्रिश्चन मिशनऱ्यांवर ओसंडून वाहत असल्याचे दिसून येते.
काही दिवसांपूर्वी बेंगळुरूमधील शिवाजी नगर मेट्रो स्टेशनला सेंट मेरी बॅसिलिका असे नाव देण्याची घोषणा करणारे कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना आता हिंदू धर्मातील सर्व दोष दिसू लागले आहेत. सिद्धरामय्या यांनी हिंदूंच्या धर्मांतराच्या कटाचा संबंध जातीव्यवस्थेशी जोडला आहे. त्यांना हिंदू धर्मातही असमानता दिसू लागली आहे.
धर्मांतराबद्दल आपले मत मांडताना सिद्धरामय्या यांनी अगदी स्पष्टपणे सांगण्याचा प्रयत्न केला आहे की धर्मांतर करणारे प्रत्यक्षात व्यवस्थेमुळे त्रासलेले आहेत. ते म्हणाले, “जरी आपण धर्मांतर करू नका म्हणतो, तरी काही लोक व्यवस्थेमुळे ते करतात. आपल्या हिंदू समुदायात जर समानता आणि समान संधी असती तर कोणी धर्मांतर का केले असते?.” त्यांनी पुढे विचारले की हिंदू समाजाने अस्पृश्यता निर्माण केली नाही का?.
“इस्लाम, ख्रिश्चन किंवा इतर कोणत्याही धर्मात असमानता असू शकते. आम्ही किंवा भाजपने कोणालाही धर्मांतर करण्यास सांगितले नाही, हा लोकांचा अधिकार आहे आणि ते त्यांच्या इच्छेनुसार ते करतात.”
हे ही वाचा :
“नेहरूंच्या अकार्यक्षमतेमुळे ईशान्य भारत चीनच्या ताब्यात गेला असता”
भारतात गुंतवणूकदारांची संपत्ती १३ पट वाढली
एआय जमिनीच्या स्तरावर घडवत आहे मोठे बदल
वर्षानुवर्षांनंतरही कार्यकर्त्यांना आठवतात पंतप्रधान मोदी
दरम्यान, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी हिंदू धर्माबद्दल केलेल्या टिप्पणीवरून वाद निर्माण झाला आहे. इस्लाममधील समानतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याची त्यांची हिंमत आहे का? असा सवाल सिद्धरामय्या यांना भाजपने विचारला आहे.
कर्नाटक विधानसभेतील विरोधी पक्षनेते आर. अशोक यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंट एक्स वर एका पोस्टद्वारे सिद्धरामय्या यांना विचारले की, ‘जर इस्लाममध्ये समानता आहे, तर महिलांना मशिदींमध्ये प्रवेश का नाही? जर इस्लाममध्ये समानता आहे, तर तिहेरी तलाकवरील बंदीला विरोध का होता? जर इस्लाममध्ये समानता आहे, तर कुराणात हिंदूंसह गैर-मुस्लिमांना काफिर का म्हटले आहे?. सिद्धरामय्या, तुमच्यात हे विचारण्याची हिंमत आहे का?’, असा सवाल त्यांनी केला.
त्यांनी पुढे विचारले की, “जर इस्लाम हा शांतताप्रिय धर्म आहे, जर मुस्लिमांमध्ये बंधुत्वाची भावना आहे, तर पहलगाममधील दहशतवाद्यांनी पर्यटकांची नावे का विचारली, त्यांना कलमा म्हणण्यास का सांगितले आणि त्यांनी फक्त हिंदूंनाच का मारले? सिद्धरामय्या, हे विचारण्याची हिंमत आहे का?”
